'या' कलाकारांनी शेअर केले बालपणाचे फोटो

तुम्ही ओळखलात का? 

Updated: Oct 2, 2019, 12:37 PM IST
'या' कलाकारांनी शेअर केले बालपणाचे फोटो  title=

मुंबई : सोशल मीडियावर बॉलिवूड अनेकदा आपल्या खासगी गोष्टी शेअर करत असतात. असेच आता दोन बॉलिवूड कलाकारांनी आपले बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना बघून तुम्ही देखील कलाकारांना ओळखणार नाही. 

या दोन्ही कलाकारांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. हे खूप क्यूट फोटो तुम्ही देखील पाहा. हे कलाकार आहेत अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री फातिमा सना शेख. 

अर्जून कपूरने इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. अर्जून कपूरसोबत चुलत भाऊ मोहित मारवाह आणि अक्षय मारवाहसोबतचे फोटो शेअर केले आहेत. हा या तिघांचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. फोटोत अर्जून कपूर दोन भावंडाच्या मध्ये उभा असून चश्मा लावला आहे. 

अर्जून कपूर सध्या त्याच्या 'पानीपत' सिनेमाच्या तयारीत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारिकर यांनी केलं आहे. सिनेमात अर्जूनसोबतच संजय दत्त आणि कृती सेनन सारखे कलाकार आहेत. यानंतर अर्जून कपूर 'संदीप' आणि 'पिंकी फरार' सारखे सिनेमे करणार आहे.

तसेच 'दंगल' सिनेमात आमीर खानची मुलगी झालेली अभिनेत्री फातिमा सना शेखने देखील फोटो शेअर केला आहे. या फोटोत हे दोघे अतिशय क्यूट दिसत आहे. या फोटोत फातिमा तिच्या भावासोबत दिसत आहे. फातिमाने या फोटोला कॅप्शन - समुंदर में नहा के और भी नमकीन हो गए है.... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Samundar main naha ke aur bhi namkin ho gaye ho.  #siblinglove Mera bhai aur main.

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh) on

फातिमाचा 'दंगल' हा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. पण तिचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर सगळ्यात फ्लॉप ठरला आहे. या दिवसांमध्ये ती दोन मोठे सिनेमे करत आहेत. ज्यामध्ये राजकुमार रावसोबत एक ड्रामा सिनेमा आणि सैफ अली खानसोबत हॉरर कॉमेडी सिनेमा आहे.