रिलेशनऐवजी S** निवडा! अरबाज खाननं मुलाच्या मित्राला दिला सल्ला; मलायकाची होती अशी रिअ‍ॅक्शन

Arbaaz Khan and Arhaan Khan : अरहान खाननं मुलगा अरबाज खानच्या 'दम बिर्याणी' या पॉडकास्टमध्ये मुलाला रिलेशनशिपऐवजी S** निवडण्याचा सल्ला दिला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 10, 2024, 04:22 PM IST
रिलेशनऐवजी S** निवडा! अरबाज खाननं मुलाच्या मित्राला दिला सल्ला; मलायकाची होती अशी रिअ‍ॅक्शन title=
(Photo Credit : Social Media)

Arbaaz Khan and Arhaan Khan : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोराचा मुलगा अरहान खान हा काही दिवसांपासून चर्चेत आहे. अरहाननं नुकताच 'दम बिर्याणी' पॉडकास्ट सुरु केला आहे. अनेकांना हा शो प्रचंड आवडत आहे. या शोमध्ये अरहान हा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करताना दिसणार आहे. आता त्याच्या पॉडकास्टच्या अपकमिंग एपिसोडमध्ये अरबाज आणि त्याचे भाऊ सोहेल खान येणार आहेत. शो चा टीझर प्रदर्शित झाला आहे ज्याला पाहून प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. 

टीझरच्या सुरुवातीला अरहान सोहेलला विचारतो की तुझ्या रुमला बरमुडा ट्रायएंगल का बोलतात. त्यावर सोहेल त्याचा एक मजेशीर किस्सा सांगताना दिसतो की एकदा तो त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या वॉर्डरोबमध्ये जाऊन लपला होता. तर माझ्या एक्स गर्लफ्रेंडची आई देखील तिथेच लपली होती. त्यानंतर अरबाजचे मित्र यावेळी रिलेशनशिपविषयी बोलताना दिसतात त्यावर तो अरबाज आणि सोहेलकडून सल्ला मागतात. त्यावर उत्तरप देत अरबाज बोलतो की तू सेक्स निवडायला हवं. त्यावर अरहान हसतो तर त्याचे मित्र अरबाजचे आभार मानताना दिसतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याशिवाय अरबाज अरहानला सांगतो की तुझे मित्र मला म्हणतात की काका मी तुमच्या या लग्नात येऊन शकणार नाही तर मी त्यांना ठीक आहे म्हटलं आणि नंतर म्हणालो त्यानंतरची असेल तेव्हा या. यानंतर अरबाज अरहानशी बोलताना दिसतो की असे जर तुझे मित्र असलीतल तर तुला खूप मेहनत करण्याची गरज आहे. 

हेही वाचा : 'लिव्ह-इनमध्ये राहणं पाप, पण लग्नाच्या आधी गरजेचं...', झीनत अमान यांचा तरुणांना सल्ला

दरम्यान, मलायकानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर करत हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. अरहानच्या दम बिर्याणीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतकंच नाही तर त्याच्या या टीझरवर कमेंट करत नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की बाप-बेटा, काका-पुतण्यात असलेलं मैत्रीचं नातं स्पष्ट दिसत आहे. तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांना हे पटलं नाही त्यांनी कमेंट करत त्यांना थेट ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'मुलांना चांगल्या गोष्टी शिकवा... त्यांना उमरा करण्यासाठी मक्काला जाण्यास सांगा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'कलयुग आला आहे. बाप-बेटे एकत्र बसून सेक्सवर चर्चा करत आहेत.' तर काही नेटकऱ्यांनी सलमानला या शोमध्ये कधी पाहायला मिळणार असा सवाल केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी खान कुटुंबाकडे जो ह्युमर आहे त्याला कोणी हरवू शकत नाही असं म्हटलं आहे.