मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) घरी ११ जानेवारी २०२१ रोजी एका गोंडस मुलीचं आगमन झालं. यानंतर सोशल मीडियावर विराट-अनुष्काला अनेक नावं सुचविण्यात आली. पण विरूष्काने लेकीचं नाव आपल्या पसंतीचं ठेवलं. १ फेब्रुवारी रोजी या मुलीचं नामकरण करण्यात आलं. 'वामिका' (Vamika) असं गोडं नाव विरूष्काने आपल्या मुलीचं ठेवलं.
यानंतर सोशल मीडियावर वामिका विराट कोहली असं नाव ट्रेंड होऊ लागले. सोशल मीडियावर विरूष्काच्या चाहत्यांनी तिचे फॅन पेज देखील तयार केले. या दरम्यान 'वामिका' चा नेमका अर्थ काय? यावर चर्चा होऊ लागली.
'वामिका' या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो 'देवी दुर्गा'. तसेच 'वामिका' या नावात विराट आणि अनुष्काच्या नावाचे अक्षर देखील आहे. वामिका या नावात पहिलं अक्षर 'व' आहे. हे तिच्या वडिलांच्या म्हणजे विराट कोहलीच्या नावावरून घेण्यात आलं. यानंतर 'वामिका' नावातील शेवटचं अक्षर 'क' म्हणजे 'का'. हे तिच्या आईच्या म्हणजे अनुष्का शर्माच्या नावावरून घेण्यात आलं आहे.
त्याचप्रमाणे 'वामिका' करता अंकज्योतिश शास्त्रानुसार '३' हा नंबर अतिशय लक्की ठरणार आहे. 'वामिका' याचा अर्थ 'शक्ती' आणि 'ताकद' असा देखील होतो. यामुळे विरूष्का आणि त्यांच्या लेकीकरता हे खूप सकारात्मक नाव असणार आहे. त्याचप्रमाणे वामिकाचा तिच्या वडिलांशी म्हणजे विराट कोहलीशी खास बाँड असणार आहे.