मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच आई-बाबा होणार आहेत. पण याच दरम्यान अनुष्का काहीशी नाराज असल्याचं दिसत आहे. विराटसोबत एक खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे तिने नाराजी व्यक्त केली आहे. पापाराझींनी विराट आणि अनुष्काचे काही खाजगी फोटो कॉमेऱ्यात कैद केले आहेत. हे फोटो पाहून अनुष्का चांगलीचं भडकली. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने पापाराझींना खडसावलं आहे.
काही दिवसांपूर्वी पापाराझींनी अनुष्का आणि विराटचा त्यांच्या लॉबीमधील एक खाजगी फोटो क्लिक केला. त्यांचा हा फोटो काही वेळातचं मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे अनुष्काचा पारा चढला.
इन्स्टाग्रामवरील एक फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'फोटोग्राफर्स आणि पब्लिकेशनला अनेकदा विनंती करूनही आमच्या खासगी आयुष्यात दखल देत आहेत. हे तात्काऴ थांबवा.' असं तिने लिहीले आहे
दरम्यान, जानेवारी महिन्यात अनुष्का तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. अनुष्काच्या प्रसूतीला आता खूप कमी दिवस राहिले आहेत. कामाबद्दल बोलायचं झालं तर अनुष्का शर्मा सध्या प्रोडक्शनमध्ये बिझी आहे. नुकतीच तिची वेबसीरिज `पाताललोक` आणि सिनेमा `बुलबुल` OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत.