मुंबई : भारतीय क्रिकेटर आणि अभिनेत्री अनुष्का शर्माची मुलगी वामिकाला गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन विरोधकांकडून बलात्काराची धमकी येत आहे. दिल्ली महिला आयोगाने (DCW) या संदर्भात दिल्ली पोलिसांना नोटीस बजावल्यानंतर, अनुष्काच्या जवळच्या एका सूत्राने धमक्यां सदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सूत्रांकडून मिळालेली अनुष्काची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला 24 ऑक्टोबर रोजी चालू असलेल्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारताच्या पराभवानंतर सतत ट्रोल केले जात होते.
वामिकाला मिळालेल्या धमक्यांबद्दल अनुष्का रागात असल्याचं अनुष्काच्या जवळच्या सुत्रांनी सांगितलं आहे. BollywoodLife.comच्या रिपोर्टनुसार, 'लोकांच्या नजरेत सेलिब्रिटी असलेल्या अनुष्काने ट्रोलिंग आणि नकारात्मक गोष्टींसाठी एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ज्या व्यक्ती आपल्याला दिसत नाहीत त्या लोकांच्या बोलण्याला अनुष्का महत्त्व देत नाही..'
'पण ती एक आई आसल्यामुळे मुलीबद्दल कोणी काही बोल्लं तर इतर महिलांप्रमाणे तिला देखील राग येईल. विराट आणि अनुष्का सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. शिवाय त्यांच्या मुलीबद्दल काय चर्चा होत आहे, हे देखील त्यांना माहिती आहे. त्यामुळे अनुष्का आणि विराट सोशल मीडियापासून दूर राहतील असं सांगण्यात येत आहे.
मुलीला मिळालेल्या धमकीनंतर विराट आणि अनुष्का सोशल मीडियापासून दूर राहण्याची शक्यता आहे. काही दिवसांनी सर्वकाही ठिक झाल्यानंतर विरूष्का पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.