‘परी’ सिनेमातील गाणं रिलीज, अनुष्काचा आणखी वेगळा अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या चर्चेत असलेल्या ‘परी’ सिनेमातील पहिलं गाणं रिलीज करण्यात आलंय.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 6, 2018, 09:14 AM IST
‘परी’ सिनेमातील गाणं रिलीज, अनुष्काचा आणखी वेगळा अंदाज title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या चर्चेत असलेल्या ‘परी’ सिनेमातील पहिलं गाणं रिलीज करण्यात आलंय. या गाण्यात अनुष्काचा आणखी वेगळा अंदाज बघायला मिळतो आहे. २ मार्चला हा सिनेमा रिलीज झालाय. हा एक हॉरर सिनेमा असून यात अनुष्का डबल रोलमध्ये आहे. 

गाणं ठरतंय हिट

एखादा सिनेमा रिलीज झाल्यावर त्यातील गाणं रिलीज करण्यात आल्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. या सिनेमाच्या ट्रेलरने आधीच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर आता या सिनेमातील गाणंही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हे गाणं इशान मित्राने गायलं आहे. तर संगीत अनुपम रॉयने दिलंय आणि गाण्याचे बोल अन्विता दत्तने लिहिले आहेत. 

किती केली कमाई?

२ मार्चला रिलीज झालेल्या अनुष्काच्या ‘परी’ सिनेमाला समीक्षकांची पसंती मिळाली आहे. अनुष्काच्या या सिनेमातील अभिनयाचं आणि तिच्या धाडसाचं कौतुक केलं गेलं आहे. हा सिनेमा रिलीज होऊन तीन दिवस झाले असून आत्तापर्यंत या सिनेमाने १५ कोटींची कमाई केली आहे.