अनुष्का शर्मा म्हणतेय, Missing You विराट कोहली

हा पहिलाच क्षण आहे जेव्हा अनुष्का - विराट पहिल्यांदा एकमेकांपासून दूर आहेत. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 24, 2018, 08:12 PM IST
अनुष्का शर्मा म्हणतेय, Missing You विराट कोहली title=

मुंबई : हा पहिलाच क्षण आहे जेव्हा अनुष्का - विराट पहिल्यांदा एकमेकांपासून दूर आहेत. 

विराट कोहली जेथे साऊथ आफ्रिकेत फ्रीडम सिरीज खेळत आहे तिथे अनुष्का जीरो या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी असणार आहे. मात्र या दरम्यान अनुष्काने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती विराट कोहलीला प्रचंड मिस करतेय हे स्पष्ट होतंय 

अनुष्काने आपल्या डॉगसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर अनुष्काने कॅप्शन लिहिलं आहे की, बघा मी कुणासोबत आपली सुट्टी घालवत आहे. यावरून कळतं की अनुष्का आपला संपूर्ण वेळ आपला डॉगी डूडसोबत घालवत आहे. 

 

Guess who chilled with me on my day off

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

अनुष्का आणि विराटने २०१७ च्या डिसेंबरमध्ये इटलीत लग्न केलं. लग्नानंतर फिनलँडमध्ये दोघांनी हनीमून साजरा केला आहे त्यानंतर या जोडीने दिल्ली आणि मग मुंबईत आपल्या लग्नाचं रिसेप्शन साजरं केलं. मुंबईत रिसेप्शन केल्यानंतर अनुष्का आणि विराट साऊथ आफ्रिकेला गेले. काही दिवस विराट सोबत राहिल्यानंतर ती मुंबईत परतली