हजार कोटींचा सिनेमा? अनुराग कश्यप म्हणाला, 'कधीच नाही...'

Anurag Kashyap on 1000 Crore Films: व्यावसायिक चित्रपटांच्या (Commercial Films) कचाट्यात सापडल्यावर नुकसान, त्रास, बंधन याची जाणीव जशी चित्रपट निर्मात्यांना तशीच ती प्रेक्षकांनाही. त्यातून यामध्ये अकडून पडणाऱ्यातला अनुराग कश्यप हा दिग्दर्शक नाही. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 3, 2023, 11:06 AM IST
हजार कोटींचा सिनेमा? अनुराग कश्यप म्हणाला, 'कधीच नाही...' title=
anurag kashyap says he would never do 1000 crore films | (Photo: Social Media)

Anurag Kashyap : सध्याचा जमाना आहे तो म्हणजे हजार कोटींच्या सिनेमांचा. 1913 साली आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीची पायाभरणी झाली आणि त्यानंतर गेल्या शंभर वर्षात हिंदी सिनेमा हा प्रचंड बदलला आहे. त्यातून चित्रपटांची व्यावसायिक गणितंही वारेमाप बदलली आहेत. बॉलिवूडचं अर्थकारण आज इतकं वेगळं आहे की त्याला काहीच तोड नाही. जसं वर म्हटलं की सिनेमा हा प्रचंड बदलला आहे. त्यातून मुख्यप्रवाहात किंवा व्यवसायाच्या प्रवाहात जाणारी मंडळी बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात असली तरीसुद्धा व्यावसायिक बंधनांना जुगारून आपल्या वेगळ्या धाटणीचे सिनेमे करणारेही दिग्दर्शक या चित्रपटसृष्टीत आहेतच. त्यातील एक नाव म्हणजे अनुराग कश्यप. गेली दोन दशक अनुराग कश्यप हा प्रेक्षकांना वेगळ्या तऱ्हेचे सिनेमे देतो आहे. त्यानं आपल्या याच वेगळ्या शैलीला प्रेक्षकांसमोर चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यातही यश मिळवले आहे. 

2012 साली आलेला 'गॅन्स ऑफ वासेपूर' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यातून या चित्रपटाची क्रेझही प्रचंड होती. या चित्रपटावर फार टीकाही झाली होती. शिव्या, हिंसा, सेक्स, खून, मारामारी, अमानुषता अशा कैक अंगानी हा सिनेमा भरलेला होता. परंतु या चित्रपटाची कथा ही फार वास्तव होती आणि प्रेक्षक म्हणून हा चित्रपट आपल्याला गुंतवून ठेवणारा आणि आपलं मनोरंजन करणाराही होता. या चित्रपटापासून ते आताच्या ओटीटी माध्यमातील 'सेक्रेड गेम्स'पर्यंत अनुराग कश्यपनं कधीच बिग बजेट चित्रपट केले नाहीत. त्यामुळे त्याची त्यातूनही वेगळी गणती होती. यावेळी एका मुलाखतीतून त्यानं बिग बिजेट चित्रपटांवर भाष्य केले आहे. व्यावसायिक चित्रपटांमध्ये मुरणारे आपण नाही असं तो प्रामाणिकपणे कबूल करतो. त्यातून आपल्या चित्रपटाला येणारे प्रेक्षक कोण? याची त्यालाही चांगलीच जाणीव आहे. 

हेही वाचा : चित्रपट निर्मात्यानं थकवले पैसे, शशांक केतकरचा आरोप; FB Post मध्ये म्हणाला...

'लोकसत्ता गप्पा'ला दिलेलल्या मुलाखतीत तो म्हणाला की, ''हजार कोटींचे चित्रपट मी कधीच करणार नाही. मी त्या शर्यतीतून बाहेर पडलो. जे लोकं बिग बजेट चित्रपट करतात त्यांचे नुकसानही मोठे असते. विकेंडला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची असे चित्रपट पाहणारे प्रेक्षक हे वाट पाहत असतात. माझा प्रेक्षक हा नाही. माझा प्रेक्षक वेगळा आहे. जे माझा सिनेमा पाहत नाही असं वाटतं ते वेळ मिळाला की माझा चित्रपट पाहतात.'' 

आपल्या सर्वांनाच गाणी, नाच, रोमान्स, इमोशन्स, मेलोड्रामा, अॅक्शन अशा तद्दन मसाल्यांनी भरलेले व्यावसायिक सिनेमे हे पाहायला आवडतात. त्यामुळे अशा सिनेमांचे वजन हे फार जास्त असते. असे सिनेमे हे 1000 कोटींचा बिझनेस करतात. त्यातून अशा चित्रपटांना मार्केटमध्ये डिमांड असल्यानं तेवढी मोठी इन्व्हेसमेंट करण्यासाठीही मोठमोठं डारेक्टर, प्रोड्यूसर मागेपुढे पाहत नाहीत. यालाच अनुराग कश्यप बगल देताना दिसतो.