मुंबई : टीव्ही कलाकार अनुपम श्याम ओझा गेल्या वर्षी गंभीर आजाराने ग्रस्त होते. किडनीच्या संसर्गामुळे अनुपम श्याम ओझाची प्रकृती गंभीर होती. अनुपम यांची प्रकृती आता ठीक आहे. आणि 'प्रतिज्ञा' 2 या सीजनमधुन टीव्हीवर ते पुनरागमन करीत आहेत. 'प्रतिज्ञा' 1 मध्ये अनुपम 'सज्जन सिंग'च्या भूमिकेत दिसले होते.
एका दिलेल्या मुलाखतीत अनुपम श्याम यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी आणि या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. अनुपमजी म्हणाले, ''मला आठवड्यातून ३ वेळा डायलिसिस होतो. मात्र, सध्या माझी तब्येत ठीक आहे. ज्याला काम करायचं आहे, त्याला सगळं सांभाळता देखील येतं.
आता काहीही झालं तरी मला मॅनेज करावेच लागेल, नाही का? आमचा 'प्रतिज्ञा' भाग 2 हा एक सुंदर कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि मी माझ्या चाहत्यांना नाराज करु शकत नाही. मी डायबिटीस रुग्ण आहे, त्यामुळे मी आजारी असताना मला थोडा प्रॉब्लेम होत होता. पण मी आता ठीक आहे.''
'प्रतिज्ञा'2 मधुन पुनरागमन करणाऱ्या अनुपजीने सांगितलं आहे की, ''असं वाटतं आहे कि, 'प्रतिज्ञा'१ सिरियल बंद झाली नाही. एवढी वर्ष चालतचं आली आहे. बस एका नव्या गोष्टीचा एंन्ड झाला आहे. आणि मी माझ्या फॅन्सचे आभार मानतो तुम्ही माझ्यावर खुप प्रेम केल्याबद्दल. आणि तुमच्या प्रेमापोटीच 'प्रतिज्ञा' ही सीरियल पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'प्रतिज्ञा १' या सिझनमध्ये सज्जन सिंह यांच्या भूमिकेतील अनुपमजी यांनी सांगितलं आहे की, माझ्या भूमिकेत हाच बदल आहे की, आता शो मध्ये माझी नातवंड दाखवण्यात येणार आहेत. त्यांच्या येण्याने सज्जनजी आता कुल अंदाजात दिसतील. मात्र त्यांचा रुद्र अवतार देखील या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या मालिकेत ते मुलं आणि नातवंडासोबत कुल अवतारात दिसतील ऐवढं नक्की...