Anupam Kher: "मला प्रचंड राग आला, मुंबई सोडून जाण्याआधी घरी गेलो अन् म्हणालो मी ब्राह्मण आहे मला..."

Anupam Kher News : अनुपम खेर यांच्या अभिनयामुळे अनेकांचं त्यांचं तोंडभरून कौतूक देखील केलं होतं. मात्र, अनुपम खेर यांना या चित्रपटातून डावलण्यात आलं होतं. त्याचा किस्सा खेर यांनी सांगितला होता.   

Updated: Nov 16, 2022, 05:05 PM IST
Anupam Kher: "मला प्रचंड राग आला, मुंबई सोडून जाण्याआधी घरी गेलो अन् म्हणालो मी ब्राह्मण आहे मला..." title=
Anupam Kher On Mahesh Bhatt

Anupam Kher On Mahesh Bhatt: बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी एकापेक्षा एक सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. 67 वर्षांच्या खेर यांनी (Anupam Kher age) आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटवला आहे. अनुपम खेर पहिल्यांदा महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या 'सारांश' या चित्रपटात (Saaransh Movie) दिसले होते. त्यानंतर हा चित्रपट सुपरहिट ठरला. विशेष म्हणजे या चित्रपटात अनुपम खेर यांनी वृद्ध वडिलांची भूमिका साकारली होती आणि त्यावेळी ते फक्त 28 वर्षांचे होते.

अनुपम खेर यांच्या अभिनयामुळे अनेकांचं त्यांचं तोंडभरून कौतूक देखील केलं होतं. मात्र, अनुपम खेर यांना या चित्रपटातून डावलण्यात आलं होतं. त्याचा किस्सा खेर यांनी सांगितला होता. एका कार्यक्रमात बोलताना खेर यांना मुंबई (Mumbai) विषयी विचारण्यात आलं होतं. त्यावर बोलताना अनुपम खेर (Anupam Kher Movies) यांनी मोठा खुलासा केलाय. (Anupam Kher On Mahesh Bhatt tells Humans of Bombay what he did on being replaced in his first film Saaransh)

सारांश चित्रपटामधील भूमिकेसाठी एक चांगला स्टार हवा म्हणून त्यांनी माझ्याऐवजी संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांना घ्यायचं ठरवलं, ज्यावेळी मला हे समजलं तेव्हा मला प्रचंड राग आला. मी त्या भूमिकेसाठी कित्तेक दिवस सराव केला होता. त्यामुळे मी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. जाताजाता महेश भट्ट (Mahesh Bhatt Movies) यांना भेटून आपलं मत सांगावं आणि जावं, असा निश्चय त्यांनी केला.

आणखी वाचा - कोणाची बादली होण्यापेक्षा मोदींचा चमचा होणे चांगले - अनुपम खेर

दरम्यान, मी माझं सामान बांधलं आणि थेट महेश भट्ट यांच्या घरी गेलो. मी त्यावेळी खूप चिडलो होतो आणि तेव्हा रागात माझ्या तोंडून एक वाक्य निघालं, मी ब्राह्मण आहे आणि मी तुम्हाला शाप देतो, असं अनुपम खेर सांगतात. त्यानंतर महेश भट्ट यांनी माझी समजूत घातली, असंही खेर यांनी सांगितलं. मात्र, महेश भट्ट यांची निवड अखेर योग्य होती, असं म्हणत त्यांनी आपली चूक देखील कबूल केली.