VIDEO: चित्रपटात काम करणं बंद करणार नाही - अनुपम खेर

अनुपम खेर, ईशा गुप्ता स्टारर 'वन डे' चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित

Updated: May 22, 2019, 10:37 AM IST
VIDEO: चित्रपटात काम करणं बंद करणार नाही - अनुपम खेर title=

मुंबई : बॉलिवुड अभिनेते अनुपम खेर पुन्हा एकदा धमाकेदार चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अनुपम खेर आणि ईशा गुप्ता स्टारर 'वन डे' चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच यूट्यूब आणि सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. चित्रपटात अनुपम खेर एका निवृत्त न्यायाधिशाची भूमिका साकारणार असून ईशा गुप्ता चित्रपटात पोलीस ऑफिसरची भूमिका साकारणार आहे.

चित्रपटातील कलाकारांनी 'वन डे'चा ट्रेलर आपल्या सोशल मीडियावरुनही शेअर केला आहे. यूट्यूबवर 'वन डे' ट्रेलरला आतापर्यंत पाच लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अशोक नंदा दिग्दर्शित 'वन डे' येत्या १४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेता अनुपम खेर यांनी 'मी कधीही चित्रपटात काम करणं बंद करणार नाही. लांब पल्ला गाठायचा असल्यास कामासाठी सतत उत्साही असणं गरजेचं आहे' असं त्यांनी म्हटलंय.

'आपण आपल्या कामासाठी नेहमी उत्साहित असलं पाहिजे. ज्यादिवशी तुम्ही वयोवृद्ध, थेस्पियन यांसारख्या शब्दांचा वापर कराल त्यादिवशी तुम्हाला काम करणं कठीण होईल. हे शब्द तुमच्या सेवानिवृत्तीच्या इशाऱ्यांसाठी वापरले जातात. परंतु मी पुढील ५० वर्षांपर्यंत हे काम सोडणार नाही' असं अनुपम खेर यांनी म्हटलंय. 

केतन पटेल आणि स्वाती सिंह यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून अशोत नंदा यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ईशा गुप्ता आणि अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिकेसह चित्रपटात जरीना वहाब, कुमुद मिश्रा, जाकिर हुसैन, राजेश शर्मा, दीपशिखा आणि मुरली शर्मा यांनीही चित्रपटात जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.