Anupam Kher यांचा आमिर खानला टोमणा; म्हणाले, ''...तर प्रेक्षक अजून सूडाने चित्रपट पाहतील''

Anupam Kher on Amir Khan: गेल्या वर्षी आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chadda) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ला होता. यावर आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आपलं परखड मतं मांडले आहे. सध्या त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आहे. नक्की ते काय म्हणाले हे या लेखातून (Anupam Kher on Laal Singh Chadda) जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 3, 2023, 12:31 PM IST
Anupam Kher यांचा आमिर खानला टोमणा; म्हणाले, ''...तर प्रेक्षक अजून सूडाने चित्रपट पाहतील'' title=

Anupam Kher Talks on Amir Khan: 2022 हे वर्ष आमिर खानसाठी फारच खराब वर्ष होत असं म्हणायला हरकत नाही. 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chadda) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. त्यामुळे आमिर खानच्या करिअरमधला हा सर्वात फ्लॉप चित्रपट ठरला. सोशल मीडियावर या चित्रपटाला बॉयकॉट करण्याचा ट्रेण्ड इतक्या जोरानं सुरू झाली की पाहता पाहता या चित्रपटाला खरोखरच प्रेक्षक मिळेनासे झाले. परंतु त्यावेळी अनेकांमध्ये मतमतांतरे होती की नक्की या चित्रपटाचे अपयश कोणते होते. बॉयकॉट ट्रेण्ड की वाईट आशय?

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी आपलं मतं या चित्रपटाविषयी बोलताना मांडले आहे. नुकत्याच त्यांनी एका मुलाखतीत या चित्रपटाचे अपयश नेमकं कशात होतं याबद्दलचे आपलं मतं मांडले आहे. (anupam kher says laal singh chadda was not a great film slams actor amir khan read his full statement)

1994 साली आलेल्या 'फॉरेस्ट गम्प' या हॉलिवूड चित्रपटानं इतिहास रचला होता. त्यावेळीची पिढी आणि आत्ताचीही पिढी हा चित्रपट आवर्जून पाहते. या चित्रपटाचा आशय आणि विषय अत्यंत वेगळा होता त्यामुळे या चित्रपटाला जगभरातून प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. 28 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये या चित्रपटाचा रिमेक करण्यात आला. 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाला हा मान मिळाला. या चित्रपटाचे प्रमोशनही तेव्हा जोरात करण्यात आले होते. त्यातून अनेकदा या चित्रपटाची प्रदर्शन तारीखही बदलण्यात आली होती. परंतु अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित झाला परंतु प्रदर्शनापुर्वी आणि प्रदर्शनानंतर मात्र या चित्रपटाला फार मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांना विरोध केला होता. 

नुकत्याच एएनआयला दिलेल्या मुलाखतीतून ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आपलं मतं मांडलं आहे. ते म्हणाले की, लाल सिंग चड्ढा ही काही एवढी ग्रेट फिल्म नव्हती. जर हा चित्रपट तसा असता तर जगातील कोणतीही ताकद या चित्रपटाला हटवण्यात यशस्वी झालीच नसती. आमिर खानचा पीके हा एक चांगला चित्रपट होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगला परफॉर्मन्स दिला होता. परंतु येथे मुद्दा असा आहे की तुम्हाला सत्य हे स्विकारणे गरजेचे आहे.

हेही वाचा - बॉक्स ऑफिसवर Ponniyin Selvan 2 चा धमाका! पाचव्या दिवशी कमवले 'इतके' कोटी

ते पुढे म्हणाले की, मी बॉयकॉट बॉलिवूड ट्रेण्डचं समर्थन करत नाही. अजिबातच नाही. मला असं नाही वाटतं की असा कुठला एखादा ट्रेण्ड चित्रपटाला बाद करण्यासाठी कारणीभूत ठरले. तुम्ही कोणाला थांबवू शकत नाही. परंतु जर का तुमचं प्रोडक्ट चांगलं असेल तर प्रेक्षक हे स्वत:हून चित्रपट पाहायला येतील. एवढंच नाही तर प्रेक्षक अजून सुडानं चित्रपट पाहतील. या ट्रेण्डला संपवायचे असेल तर एकच उपाय आहे तो म्हणजे तुम्ही चांगलं काम करा.  

2015 साली आपल्या भारतात राहायची भिती वाटते असं वक्तव्य आमिर खाननं केलं होतं त्याकडेही लक्ष वेधत ते पुढे म्हणाले की, मला नाही वाटतं अशाप्रकारच्या कुठल्याही ट्रेण्डचा चित्रपटावर परिणाम होईल. जर चित्रपट चांगला असेल तर तो चालेल परंतु नसेल तर तो चालणार नाही. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जर कोणा अभिनेत्याला कुठल्याही समस्येवर काही बोलायचे असेल तर त्याला बोलण्याचा अधिकार आहे. परंतु त्याच्यात हेही धाडस असायला पाहिजे की जेव्हा लोकं त्यांच्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांनीही ते शांतपणे ऐकणे गरजेचे आहे.'', असं त्यांनी आपलं मतं स्पष्ट केलं.