मुंबई : अनुकृती वास या 19 वर्षाच्या तामिळनाडू विद्यार्थिनीने फेमिना मिस इंडिया 2018 विजेतेपदाचा मान पटकावला आहे. हा सोहळा मुंबईत पार पडला असून फिल्ममेकर करण जोहर आणि अभिनेता आयुषमान खुराना हे या सोहळ्याला उपस्थित होते. अनुकृतीने 29 स्पर्धकांना मागे टाकत हा किताब जिंकला आहे. खूप उशीरापर्यंत सुरू असलेल्या या स्पर्धेत मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने हा ताज घातला.
या कार्यक्रमात हरियाणातील मीनाक्षी चौधरी फर्स्ट रनर अप तर सेकेंड रनर अप आंध्र प्रदेशती श्रेया राव झाली. दिल्लीत राहणाऱ्या गायत्री भारद्वाज, झारखंडमध्ये राहणारी स्टेफी पटेल टॉप 5 मध्ये सहभागी झाल्या.
TOP 5 of @fbb_india @ColorsTV @feminamissindia 2018 finale
Gayatri Bhardwaj - Miss India Delhi
Meenakshi Chaudhary - Miss India Haryana
Stefy Patel - Miss India Jharkhand
Anukreethy Vas - Miss India Tamil Nadu
Shreya Rao Kamavarapu - Miss India Andhra Pradesh #MissIndiaFinale pic.twitter.com/BaN0pbshzH— Miss India (@feminamissindia) June 19, 2018
फेमिना मिस इंडिया 2018 ची ही संध्याकाळ अनेक सिनेतारकांनी सजली होती. देशभरातून निवडून आलेल्या या स्पर्धकांनी कार्यक्रमात एक वेगळाच रंग भरला. पण अनुकृतीने सगळ्यांना मागे टाकत हा किताब आपल्या नावे करून घेतला. अनुकृती ही खेळाडू आणि डान्सर आहे. अनुकृती आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फ्रेंचमध्ये बीए करत आहे. अनुकृतीला बाईक चालवणं आवडत असून तिला सुपरमॉडेल व्हायचंय.
या स्पर्धेत जज पॅनलमध्ये बॉलिवूडचे अनेक सिनेकलाकार सहभागी होते. यामध्ये अभिनेत्री मलायका अरोरा, अभिनेता बॉबी देओल, कुनाल कपूर, क्रिकेटर इरफान पठान आणि के एल राहुल सहभागी होते. यासोबतच 2017 चा मिस वर्ल्ड किताब पटकावलेली मानुषी छिल्लर देखील उपस्थित होती.