मुंबई : काही वर्षांपूर्वी 'मुन्नी' आणि 'शिला' आयटम सॉन्गने फक्त मोठ्यांना वेड लावलं नव्हतं तर लहान मुलं देखील त्यांच्या जाळ्यात अडकले होते. 'मुन्नी' आणि 'शिला'ला मागे टाकण्यासाठी आता 'चिंगारी' पुढे आली आहे. बॉलिवूडच्या गाण्याला लावलेला मराठी तडका सर्वांना घायाळ करत आहे. अभिनेता सलमान खान आणि आयुष शर्मा स्टारर 'अंतिनृम' (Antim) चित्रपटातील 'चिंगारी' आयटम सॉन्गवर मराठी तडका लावण्याऱ्या अभिनेत्रीचं नाव वलूश्चा डी-सूझा आहे. वलूश्चाच्या 'चिंगारी'ने इंटरनेट तापवलं आहे.
'चिंगारी' गाण्याला मराठी पारंपरिक लावणीत सादर करण्यात आलं आहे. चित्रपटातील 'विघ्नहर्ता', 'भाई का बर्थडे' एक रोमांटिक गाणं 'होने लगा' प्रदर्शित झाल्यानंतर निर्मात्यांनी 'चिंगारी' आयटम सॉन्ग प्रदर्शित केलं आहे. वैभव जोशी यांनी लिहिलेले आणि सुनिधी चौहान यांनी गायले आहे. गाण्याचा व्हिडिओ रिलीज होताच 15 लाख 61 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहा...
'चिंगारी' गाणं कृती महेशने कोरिओग्राफ केलं असून हितेश मोडक यांनी संगीत दिले आहे. 'अंतिम' चित्रपट 26 नोव्हेंबरला झी स्टुडिओजद्वारे जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सलमान, आयुष आणि महिमा मकवाना स्टारर 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित, सलमान खान निर्मित आणि सलमान खान फिल्म्स प्रस्तुत आहे....