बच्चन कुटूंबियांना अजून एक मोठा धक्का; जवळची व्यक्ती रुग्णालयात दाखल

 सध्या सतत बॉलिवूडमधील बच्चन कुटूंब कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत आहे. नेहमीच हे कुटूंबीय सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्यांपैकी एक आहे. सध्या बच्चन कुटूंबीयातील ऐश्वर्या आणि अभिषेक ही जोडी दुराव्याच्या अफवांमुळे चर्चेत आहे 

Updated: Dec 7, 2023, 11:15 AM IST
बच्चन कुटूंबियांना अजून एक मोठा धक्का; जवळची व्यक्ती रुग्णालयात दाखल title=

मुंबई : सध्या सतत बॉलिवूडमधील बच्चन कुटूंब कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत आहे. नेहमीच हे कुटूंबीय सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्यांपैकी एक आहे. सध्या बच्चन कुटूंबीयातील ऐश्वर्या आणि अभिषेक ही जोडी दुराव्याच्या अफवांमुळे चर्चेत आहे तर नुकतीच ही जोडी पुन्हा एकत्र दिसल्यामुळे त्याच्यां दुराव्यांच्या बातम्यांना पुर्ण विराम मिळाला आहे. मात्र आता बच्चन कुटूंबीयांच्या बाबतीत अजून एक मोठी बातमी समोर येत आहे. या कुटूंबीयांच्या जवळच्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांची आई इंदिरा भादुरी यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. नुकतंच अभिनेत्रीच्या आईला लिलावती हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आज ७ डिसेंबरला त्यांच्यावर हृद्याची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. जया बच्चन यांची आई इंदिरा भादुडी या 93 वर्षांच्या आहेत. ज्या सध्या हृद्ययाच्या आजाराशी झुंज देत आहेत. यामुळेच त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. सर्जरी दरम्यान त्यांना पेसमेकर लावण्यात येणार आहे. एका जवळ्याच्या सुत्रांनी एबीपीला दिलेल्या माहितीत सांगितलं आहे की, , सध्या इंदिरा भादुरी यांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. रिपोर्ट्सनुसार, नुकतीच जया बच्चन आपल्या आईला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या.

'द आर्चीज'च्या प्रीमियरमध्ये जया बच्चन पोहचल्या होत्या
जया बच्चन त्यांचा नातू अगस्त्य नंदाच्या डेब्यू सिनेमा 'द आर्चीज'च्या प्रीमियरमध्ये पोहचल्या होत्या. जया यांच्यासोबत त्यांचं संपुर्ण कुटूंबीयदेखील तिथे उपस्थित होतं. जया बच्चन तिथे महानायक अमिताभ बच्चनसोबत अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या, श्वेता नंदा, नव्या नवेली नंदासोबत पोहचल्या होत्या. 

'द आर्चीज'च्या प्रीमियरला बच्चन फॅमिलीने एकत्र पोझ दिल्या
'द अर्चिज' प्रिमीयर नाईटमधून बच्चन फॅमिलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये ऐश्वर्या राय तिचा पती अभिषेकसोबत संपुर्ण कुटूंबासोबत पोझ देताना दिसली होती. प्रीमियरमध्ये बच्चन कुटुंबीयांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्यातील मतभेदाच्या बातम्या आता पूर्णपणे फेटाळून लावल्या जात आहेत.  ७ डिसेंबरला OTT प्लॅटफॉर्म Netflix वर  'द आर्चीज' हा सिनेमाप्रदर्शित होणार आहे.'रॉकी और रानी की प्रेम कहानी'  या सिनेमात जया बच्चन शेवटच्या दिसल्या होत्या.