जितेंद्र यांनी पूर्ण केली ज्युनिअर महमुद यांची 'ही' इच्छा, अवस्था पाहून अश्रू अनावर

Jeetedndra Complete Junior Mehmood Wished : लोकप्रिय अभिनेता ज्युनिअर महमूद यांची अभिनेता जितेंद्र यांनी घरी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान महमूह यांची अवस्था बघून अश्रू अनावर झाले.     

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 7, 2023, 11:07 AM IST
जितेंद्र यांनी पूर्ण केली ज्युनिअर महमुद यांची 'ही' इच्छा, अवस्था पाहून अश्रू अनावर title=

60 आणि 80 च्या दशकात 'ब्रह्मचारी', 'बॉम्बे टू गोवा', 'नटमन', 'घर घर की कहानी' आणि 'गुरु और चेला' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या ज्युनियर महमूदची गणना लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये केली जाते. आजही प्रेक्षक ज्युनिर महमुद यांना पसंत करतात. त्यांच्या स्टेज 4 कॅन्सरच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, त्यांनी बॉलिवूडच्या लोकप्रिय सुपरस्टारला भेटण्याची इच्छा व्यक्त केली असून, याचा उल्लेख त्यांचे मित्र सचिन पिळगावकर याला केला. त्याचवेळी चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या वतीने विनंती करण्यास सुरुवात केली. यानंतर, अपडेट आले आहे की जितेंद्र, जूनियर महमूदला भेटायला आला होते, ज्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

खालिद मोहम्मदने X वर शेअर केलेल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, भूतकाळातील लाडका बालकलाकार ज्युनियर मेहमूद चौथ्या स्टेजच्या कर्करोगामुळे रुग्णालयात दाखल आहे. त्यांनी जितेंद्र यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा बालपणीचा मित्र सचिन पिळगावकर यांच्याकडे व्यक्त केली. कृपया जितेंद्र साहेब आणि सचिन जी त्यांची इच्छा पूर्ण करा. या ट्विटवर सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रेया पिळगावकरने लिहिले की, पापा त्यांच्या रुग्णालयात जाऊन भेटले.

यानंतर, अभिनेता तुषार कपूरने वडील जितेंद्र आणि ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर मेहमूद यांच्या भेटीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

नुकतेच ज्युनियर महमूदचे मित्र सलाम काझी यांनी एएनआयला सांगितले की, "तो 2 महिन्यांपासून आजारी होता आणि सुरुवातीला आम्हाला वाटले की, त्याला काही किरकोळ समस्या असेल पण त्यानंतर अचानक त्याचे वजन कमी होऊ लागले आणि जेव्हा वैद्यकीय अहवाल आला तेव्हा असे सांगण्यात आले , असे आढळून आले. यकृत आणि फुफ्फुसात कॅन्सर आहे आणि आतड्यात गाठ आहे आणि त्याला कावीळही झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू आहेत पण डॉक्टरांनी सांगितले की हा स्टेज फोर कॅन्सर आहे." ही बातमी कळल्यानंतर चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या असतानाच अभिनेता जॉनी लीव्हर त्याला भेटायला आला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.