अंकिता लोखंडे विकाससोबत अडकली लग्नबंधनात, कोण आहे हा? Video मुळं खुलासा

Ankita Lokhande 2nd Wedding :  विकी जैननंतर अंकिता विकाससोबत अडकली लग्न बंधनात... कोण आहे हा विकास व्हिडीओमध्ये केलाय खुलासा...

दिक्षा पाटील | Updated: Aug 9, 2023, 03:44 PM IST
अंकिता लोखंडे विकाससोबत अडकली लग्नबंधनात, कोण आहे हा? Video मुळं खुलासा title=
(Photo Credit : Ankita Lokhande Instagram)

Ankita Lokhande 2nd Wedding : बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच अंकितानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अंकितानं ती पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

अंकितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत 38 वर्षांची अंकिता ही विकी जैनसोबत लग्न करताना दिसत आहे. अंकिता आणि विकी यांनी पुन्हा एकदा लग्न केलं आहे. या व्हिडीओला शेअर करत अंकितानं कॅप्शन दिलं की 'आम्ही पुन्हा एकदा लग्न केल.' त्यांनी हे लग्न ख्रिश्चन पद्धतीनं केलं आहे. ज्यात सगळ्यात आधी विकी अंकितावर त्याच्या ढोपरावर बसून तिला फुलांचा गुच्छा देताना दिसत आहे. तर तिथे जवळच एक पादरी देखील उपस्थित आहेत. त्यानंतर अंकिता आणि विकी हे किस करताना दिसत आहेत. अंकितानं या व्हिडीओत गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. त्या साडीत अंकिता ही खूप सुंदर दिसत आहे. तर विकीनं पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. त्यात विकी खूप हॅन्डसम दिसत आहे. त्या दोघांना या गोष्टीचा खूप आनंद होत आहे. तर अनेकांनी यावरून त्यांना ट्रोल केलं आहे. दरम्यान, विकीनं त्याचं नाव बदललं असून आता तो विकी नाही तर विकास आहे. त्यानं नाव बदलल्यानं ते लग्न बंधनात अडकल्याचे म्हटले जात आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

अंकिता आणि विकी यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. त्यात अनेकांनी सुशांत सिंह राजपुतचं नाव घेतलं आहे. अंकिताच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'पहिल्यांदा लग्न केलं ते व्यवस्थित वाटलं नाही का. दुसरा नेटकरी म्हणाला की 'जेव्हा लोकांकडे खूप पैसे असतात तेव्हा त्यांना कळत नाही की त्याचं काय करायला हवं. त्यानंतर ते गरज नसलेल्या कोणत्याही गोष्टीवर असे पैसे खर्च करू लागतात.' काही नेटकऱ्यांनी सुशांत सिंह राजपुतचा उल्लेख करत त्याच्या आत्म्याला शांती मिळो असं म्हटलं आहे.' 

हेही वाचा : 30 कोटींचं घर ते 6 कोटींची व्हॅनिटी व्हॅन...; महेश बाबूच्या एकूण संपत्तीविषयी जाणून बसेल धक्का

अंकिता आणि विकी जैन यांनी 14 डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी लग्न केलं. सोशल मीडियावर त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले होते. त्यात त्यांनी दुसऱ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आधीच दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. लग्ना आधी ते दोघे अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये आहे. त्या आधी अंकिता ही सुशांत सिंह राजपुतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. तर त्यांच्या ब्रेकअप नंतर अंकिता विकी जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आली तर सुशांत सिंह राजपुत रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होता.