रजनीकांत यांच्यासोबत झळकणार मराठमोळी अंजली पाटील

सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी 'काला करिकालन' चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला असून, काळया आणि लाल रंगातील हा पोस्टर पाहताक्षणीच लक्ष वेधून घेतो आहे. रजनीकांत यांचा जावई धनुष या चित्रपटाची निर्मिती करतो आहे. विशेष म्हणजे या सिनेमात रजनीकांत यांच्या अपोझिट मराठमोळी अंजली पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Updated: May 29, 2017, 02:52 PM IST
रजनीकांत यांच्यासोबत झळकणार मराठमोळी अंजली पाटील title=

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी 'काला करिकालन' चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला असून, काळया आणि लाल रंगातील हा पोस्टर पाहताक्षणीच लक्ष वेधून घेतो आहे. रजनीकांत यांचा जावई धनुष या चित्रपटाची निर्मिती करतो आहे. विशेष म्हणजे या सिनेमात रजनीकांत यांच्या अपोझिट मराठमोळी अंजली पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

सिनेमातील अंजलीच्या रोलबद्दल अजुन गुप्तता बाळगण्यात आली आहे. राधिका आपटेनंतर दुसरी मराठमोळी हिरोईन रजनीकांतच्या अपोझिट झळकणार असल्यामुळे साहजिकचं या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे. अंजली याआधी प्रकाश झा यांच्या 'चक्रव्ह्यू' या सिनेमात दिसली होती. याबरोबरचं अंजलीने मिर्झिया, दिल्ली डेज, श्री या सिनेमातही भूमिका केल्या आहेत. पदार्पणाच्या सिनेमातूनचं स्मिता पाटील यांच्याशी अंजलीची तुलना होत असून हा सिनेमा अंजलीसाठी माईल्डस्टोन ठरु शकतो.