'ॲनिमल' चित्रपटातील अभिनेत्रीला ओळखलं का?

Animal Actress Unseen Photo : 'ॲनिमल' चित्रपटात असणाऱ्या या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलत का? 

दिक्षा पाटील | Updated: Dec 11, 2023, 04:55 PM IST
'ॲनिमल' चित्रपटातील अभिनेत्रीला ओळखलं का? title=
(Photo Credit : Social Media)

Tripti Dimri Unseen Photo : 'ॲनिमल' या चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ति डिमरी चांगलीच चर्चेत आली आहे. तृप्ति ही 29 वर्षांची आहे. तर इतक्या कमी वयात लोकप्रियता मिळवत सगळ्यांच्या मनात जागा करणारी तृप्ति आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तृप्तिला तर अनेकांनी नॅशनल क्रशचा टॅग देखील दिला आहे. या चित्रपटानंतर नेटकरी तिच्याविषयी अनेक गोष्टी सर्च करताना दिसत आहेत. तृप्तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जरी तिचे अनेक बोल्ड फोटो दिसत असले तरी तिचे असे काही फोटो आहेत जे पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला आश्चर्य होईल की ही तृप्ति आहे. अनेकांना तर तिला ओळखता येत नाही आहे. 

तृप्तिचे लहानपणीचे काही फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती कोण आहे हे ओळखणं खूप कठीण आहे. तृप्तिला लहाणपणापासून अभिनयाची आवड होती. लहाण असताना तृप्ति ही त्यांच्या कॉलनीत होणाऱ्या रामायण कार्यक्रमात सहभाग घ्यायची. तिचे काही जुन्या पोस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या पोस्टमध्ये तृप्तिनं सांगितलं की दसऱ्याच्या निमित्तानं रामलीलामध्ये ती दुर्मुख आणि सीतेच्या मैत्रिणीच्या भूमिकेत होती. 

पाहा फोटो : 

animal fame Tripti Dimri Unseen Photo from childhood

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरंतर तृप्तिचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंमध्ये तृप्ति विना मेकअपमध्ये दिसते. तिचा हा लूक देखील तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. त्याची तुलना करता आता तृप्तिचा बदललेला लूक पाहून चाहत्यांना आश्चर्य झाले आहे. तर काही तिच्या या लूकची देखील चर्चा करत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तृप्ति डिमरीच्या लोकप्रियते विषयी बोलायचे झाले तर 'ॲनिमल' या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स वाढले. तिला अनेक मोठा बॅनर्सच्या ऑफर मिळत आहेत. आता ती कोणत्या कोणत्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार हे आपल्या सगळ्यांना लवकरच कळेल. 

हेही वाचा : हिंदी-मराठी नव्हे, 'या' भाषेच्या चित्रपटात काम करण्यासाठी नाना पाटेकर उत्सुक

तृप्तिच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पोस्टर बॉइज' या चित्रपटातून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्याशिवाय ती नेटफ्लिक्सवरील 'कला', 'बुलबुल' आणि लैला मजनूसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. दरम्यान, त्या आधी तृप्ति चर्चेत येण्याचं कारण हे अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश होता. ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. मात्र, त्या दोघांचं हे नातं जास्त काळ टिकलं नाही. या वर्षी जुन महिन्यात त्यांचा ब्रेक अप झाला.