धमेंद्रला आनंद सिनेमाचा हिरो व्हायचं होतं म्हणून रात्रभर राडा केला पण....

दिग्दर्शिक हृषिकेश मुखर्जी यांनी आनंद कुमारची भूमिका किशोर कुमार यांना पहिली ऑफर केली.

Updated: Apr 30, 2021, 02:05 PM IST
धमेंद्रला आनंद सिनेमाचा हिरो व्हायचं होतं म्हणून रात्रभर राडा केला पण.... title=

मुंबई : राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा क्लासिक चित्रपट 'आनंद'ला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1971साली रिलीज झालेला हा चित्रपट राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या करिअरचा टर्निंग पॉईंट होता. राजेश खन्ना या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हते.

दिग्दर्शिक हृषिकेश मुखर्जी यांनी आनंद कुमारची भूमिका किशोर कुमार यांना पहिला ऑफर केला. किशोर कुमार यांचं कुणा बंगाली दिग्दर्शकासोबत भांडण झालं होतं. किशोर कुमारने आपल्या गार्डला सांगितलं की, जर एखादा बंगाली घरी आला तर त्याच्याशी काहीच न बोलता त्याला त्याच्या घरी जायला सांग.

हृषिकेश मुखर्जी किशोर कुमार यांना 'आनंद' चित्रपटाची ऑफर द्यायला त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेले होते. गैरसमजांमुळे गार्डने किशोर कुमार यांना घराबाहेर काढलं. यानंतर शशी कपूर यांना या भूमिकेची ऑफर देण्यात आली.

धर्मेंद्रला ऐकवली होती कहाणी
धर्मेंद्रने द कपिल शर्मा शोमध्ये 'आनंद'शी संबंधित एक किस्सा सांगितला. धर्मेंद्रने सांगितलं की, हृषीकेश मुखर्जी राजेश खन्ना यांच्यासोबत चित्रपट बनवत आहेत हे कळताच त्यांना वाईट वाटलं.

नशेत दिल्या होत्या शिव्या
या चित्रपटात राजेश खन्ना मुख्य भूमिकेत असल्याचं जेव्हा त्यांना कळालं तेव्हा त्यांनी नशेच्या अवस्थेत दिग्दर्शकाला बोलावले, असं धर्मेंद्र यांनी सांगितलं होतं. धर्मेंद्र म्हणाले, 'मी ऋषिदाला सांगितलं होतं की, तू मला ही भूमिका देणार होतास, तू मला या चित्रपटाची स्टोरी सुद्धा सांगितली होती. मग तुम्ही मला हा चित्रपट का दिला नाही?

धर्मेंद्र पुढे म्हणाले, 'त्याने मला सांगितलं, धर्मेंद्र झोप, झोप. आपण सकाळी बोलू. त्याने माझा फोन डिस्कनेक्ट केला. तो फोन ठेवत होता आणि मी पुन्हा कॉल करीत होतो. मला त्याला विचारायचं होतो की, त्याने मला ही भूमिका का दिली नाही?'