'काल स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहिला अन्...', अमृता खानविलकरनं केलं अंकिता लोखंडेचं कौतुक

Amruta Khanvilkar on Swatantra Veer Savarkar : अमृता खानविलकरनं नुकताच पाहिला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट... तर पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

दिक्षा पाटील | Updated: Apr 1, 2024, 03:28 PM IST
'काल स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहिला अन्...', अमृता खानविलकरनं केलं अंकिता लोखंडेचं कौतुक title=
(Photo Credit : Social Media)

Amruta Khanvilkar on Swatantra Veer Savarkar : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे यांचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. नुकताच या चित्रपटाचा मराठी प्रीमियर पार पडला. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर स्क्रिनिंगच्या वेळी अभिनेत्री अमृता खानविलकर ही देखील तिथे पोहोचली होती. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले. दरम्यान, आता चित्रपट पाहिल्यानंतर अमृता खानविलकरनं तिला हा चित्रपट कसा वाटलं हे सांगितलं. 

अमृतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सावरकर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत म्हणाली की "काल स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट मराठीमध्ये पाहण्याची संधी मला मिळाली. रणदीप हुड्डा सरांनी वीर सावरकर यांच्या आयुष्याचं कुशलतेनं रचलेलं आणि सादर केलेलं जणू चित्र मला पाहायला मिळालं. त्यांच्या आयुष्यातील प्रवास हा सुंदर सिनेमॅटोग्राफीमुळे हुबेहुबे पाहायला मिळाला. चित्रपटात असे काही क्षण आहेत जे तुम्हाला वेदना ... राग ... दुःख …. असहायता .... या सगळ्यांची एक रोलर कोस्टर राईड करुन दाखवते. अंकिता लोखंडेनं यमुना बाई म्हणून अप्रतिम अभिनय केला आहे. यमुनाबाई यांच्यात असलेली ताकद अंकूनं दाखवली आहे. अंकू तुला सलाम. काय कमाल आहे. याशिवाय लास्ट बट नॉट द लिस्ट सुबोध भावेच्या आवाजानं मला त्या भूमिकेनं कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना केला, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्याची अॅक्शन आणि भावना या प्राकर्षानं जाणवल्या. जबरदस्त."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, अमृतानं शेअर केलेल्या या पोस्टवर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अमृताच्या पोस्टवर अंकिता लोखंडे रिप्लाय करत म्हणाली, "अम्मू, माझ्या कामाचं कौतुक करण्यासाठी आणि नेहमी माझ्यासोबत राहण्यासाठी धन्यवाद." तर सुबोध भावेनं कमेंटमध्ये "अमृता" म्हणत रेड हार्ट इमोटिकॉन वापरले आहेत. थोडक्यात या दोघांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिचे आभार मानले आहेत. 

हेही वाचा : सर्वांसमोर ऋषि कपूर यांनी रणबीरच्या कानशीलात लागावली; कारण ठरली 'ही' धार्मिक चूक

या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा 22 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडेशिवाय अमित सियाल या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटानं 10 दिवसात 15.98 कोटींची कमाई केली आहे.