Amruta Fadanvis यांनी घेतली आशा भोसलेंची भेट, आशाताईंनी गायनासंबंधीत दिला हा 'मोला'चा सल्ला

Amruta Fadnavis shares photo with Asha Bhosle : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर आशा भोसले यांना भेटल्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी खुलासा केला की आशा भोसले यांनी त्यांना काही सल्ले दिले आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 13, 2023, 06:01 PM IST
Amruta Fadanvis यांनी घेतली आशा भोसलेंची भेट, आशाताईंनी गायनासंबंधीत दिला हा 'मोला'चा सल्ला title=
(Photo Credit : Amruta Fadnavis Instagram)

Amruta Fadnavis shares photo with Asha Bhosle :बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय आणि प्रतिष्ठित गायिका म्हणजे आशा भोसले (Asha Bhosle). आशा भोसले यांनी आजवर अनेक गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजानं सगळ्यांना वेड लावलं. आजही लोक त्यांची गाणी ऐकतात. इतकंच नाही तर अनेक लोक प्रतिक्षा करत असतात की आशा भोसले यांनी कधीतरी आमची गाणी ऐकावी आणि आम्हाला काही सल्ले द्यावे. इतकंच काय तर त्यांनी दिलेले सल्ले अनेक लोक नित्य नियमानं पाळतात. काही लोक ज्या प्रकारे आशा भोसले त्यांचा आवाज जपण्यासाठी जे काही करतात ते करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानिमित्तानं अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी त्यांची भेट घेतली होती. त्याचे काही फोटो अमृता फडणवीस यांनी शेअर केले आहेत. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अमृता फडणवीस आणि आशा भोसले या सोफ्यावर बसल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ते गप्पा मारताना दिसते. हे फोटो शेअर करत मी नुकतंच आशा भोसले यांना भेटले आणि राज्याचा सर्वोच्च पुरस्कार असलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. त्यावेळी मी त्यांच्याबरोबर संगीताबाबत संवादही साधला. यावेळी त्यांनी मला अनेक सल्ले दिली. सतत सराव आणि व्हॉईस मॉड्युलेशनबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. कशी प्रॅक्टिस करायची हे देखील सांगितले. आता पुढील म्युझिक सेशनसाठी खूप उत्सुक आहोत,' असे कॅप्शन अमृता फडणवीस यांनी दिले आहे. अमृता फडणवीस यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'एक माणूस म्हणून मी...', Akshaya Deodhar सोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुयश टिळकनं केलं असं काही

दरम्यान, गेल्या महिन्यात 24 मार्च रोजी आशा भोसले यांना सायंकाळी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. आशा भोसले यांना 2021 साली हा पुरस्कार जाहिर करण्यात आला होता. त्या पुरस्कारासोबत त्यांना 25 लाख रुपये रोख, मानपत्र, शाल, स्मृतिचिन्ह आणि श्रीफळ देण्यात आलं होतं. 

कोणाच्या अध्यक्षतेखाली देण्यात येतो ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार? 

राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार हा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येतो. तर त्यांनीच ‘महाराष्ट्र भूषण 2021’ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.