मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम त्यांच्या हटके लूकमुळे, गोड आवाजामुळे तर कधी राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पण आता त्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एक खास गाणं प्रसिद्ध केलं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या संध्याकाळी त्यांनी हे गाणं आपल्या अधिकृत फेसबुक आणि युट्यूबवर शेअर केले आहे.
सध्या सोशल मीडियावर हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. 'ये नयन डरे डरे' असं या गाण्याचे नाव आहे. हे गाणं समुद्र किनाऱ्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये अमृता फडणवीस देखील अतिशय सुंदर दिसत आहेत.
व्हेलेंटाइन डे विक दरम्यान त्यांनी नेटकऱ्य़ांना नव्या भेटीसंबंधी संकेत दिले होते. त्यावेळी या खास भेटीविषयी चर्चा देखील रंगली होती. मात्र ही भेट त्यांनी व्हेलेंटाइन डे पर्यंत गुपीत ठेवली. व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच. चंगलाचं व्हयरल होत आहे.
रेड गाऊनमधील काही फोटो शेअर करत त्यांनी फोटोला एक कॅप्शनही दिलं. त्या कॅप्शनमधून त्या काहीतरी नवीन घेऊन येत असल्याचं सूचवलं होतं. याआधी देखील त्यांनी अनेक गाण्यांना स्वर देवून व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुद्धा अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं आहे.