अभिनेत्रीसोबत बिग बींचं रोमँटिक गाणं शूट होऊनही कोणालाच पाहता का आलं नाही?

अमिताभ बच्चन आणि अभिनेत्रीचं रोमँटीक गाणं शूट तर झालं, पण प्रेक्षकांना आजपर्यंत पाहाता आलं नाही, कारण...  

Updated: Mar 4, 2022, 09:33 AM IST
अभिनेत्रीसोबत बिग बींचं रोमँटिक गाणं शूट होऊनही कोणालाच पाहता का आलं नाही?  title=

मुंबई : आज तरूणांच्या मनात अभिनेता रणबीर कपूर, वरूण धवन यांसारख्या कलाकारांची क्रेझ असली तरी, महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची आतूरता चाहत्यांच्या मनात कायम असते. बिग बींनी आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री अरूणा ईराणी. 

बिग बी आणि अरुणा यांनी बॉम्बे टू गोवा (Bombay To Goa) सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतलं. आज सिनेमाने 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने अरुणा ईराणी यांनी एक गंमतीदार किस्सा सांगितला. 

aruna irani reveals why her romantic song with Amitabh Bachchan was deleted from Bombay To Goa

अरुणा ईराणी म्हणाल्या, 'त्या काळी मी आणि अमिताभ उत्तम डान्सर होतो. पण कोरियोग्राफर पीएल राज आमच्याकडून प्रचंड सराव करून घ्यायचे. मेहनतीचा रिजल्ट देखील चांगला आला.'

पुढे त्या म्हणाल्या, 'सिनेमातील 'तुम मेरी जिंदगी में' गाण कट करण्यात आलं. कारण सिनेमा क्राईम आणि थरार कथेवर आधारित होता. ज्यामुळे  निर्माते आणि दिग्दर्शकांनी सिनेमातून रोमँटीक गाणं कट करण्याचा निर्णय घेतला. ' 

बिग बी आणि अरुणा स्टारर 'बॉम्बे टू गोवा' सिनेमा 1966 साली प्रेक्षकांच्या भेटीस आला. सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक एस रामनाथन यांनी केलं.