बिग बी अमिताभ बच्चन यांना दुखापत, तरीही पूर्ण केलं 'KBC 13' चं शुटिंग

शो मस्ट गो ऑन या वयात एवढी दुखापत झाल्यानंतरही महानाय बिग बींनी पूर्ण केलं KBC 13 चं शूट

Updated: Oct 1, 2021, 10:17 PM IST
बिग बी अमिताभ बच्चन यांना दुखापत, तरीही पूर्ण केलं 'KBC 13' चं शुटिंग title=

मुंबई: बॉलिवूडचे सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती हा शो खूप प्रसिद्ध आहे. काही लोक त्यांचा हा शो GK वाढवण्यासाठी तर काही लोक केवळ अमिताभ बच्चन यांच्यासाठी शो पाहतात. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिली आहे. त्यांना झालेल्या दुखापतीमुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली.

बिग बी अमिताभ बच्चन लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते सोशल मीडियावर प्रार्थना करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या पायाला लागलं असूनही ते KBC 13 च्य़ा सेटवर शूटिंगसाठी पोहोचले. त्यांनी आपलं शूटिंग पूर्ण केलं. 

शूटिंग दरम्यान त्यांनी अशी चप्पल घातली होती. ज्यामधून त्यांच्या पायाच्या बोटाला बांधलेली पट्टी दिसत होती. फ्रॅक्चर आणि पायाच्या बोटाला पट्टी असल्याने पायाचे बोट खूप जास्त दुखत होतं, असं अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. 

KBC 13 च्या सेटवरी एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या पायाच्या बोटाला पट्टी बांधलेली दिसत आहे. त्यांनी पारंपारिक पोषाखात नवरात्रीसाठीचा एक स्पेशल एपिसोड शूट केल्याची माहिती मिळाली आहे. त्याच दरम्यानचा हा फोटो असल्याचं सांगितलं जात आहे. या वेळी त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये पायाला दुखापत झालेली असतानाही शूटिंग पूर्ण करताना काय वेदना होत होत्या ते सांगितलं आहे. 

अमिताभ म्हणाले की, तुटलेलं बोट, सांध्यावर फ्रॅक्चर आणि असह्य वेदना…. यावर प्लॅस्टर करता येत नाही त्यामुळे मी निराश झालोय... कारण यासाठी अद्याप कोणतीही पद्धत सापडली नाही. म्हणून एक प्रभावी काम केले गेले आहे, सामान्य भाषेत याला 'बडी टॅपिंग' म्हणतात...तुटलेले बोट सहानुभूती आणते ... आता ते 4-5 आठवड्यांसाठी टेप करण्यात आलं आहे.

यावरून असं दिसत आहे की पुढचे चार ते पाच आठवडे बिग बी अमिताभ यांच्या पायावर अशी पांढरी पट्टी असणार आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहे.