अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोतील 'तो' लहान मुलगा कोण, अभिषेकचं बोट पकडणाऱ्या चिमुकल्याचीच चर्चा

Bachchan Family : सध्या बच्चन कुटुंबीय वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. आता कारण आहे ते बच्चन कुटुंबातील हा चिमुकला.. अमिताभ यांनी अभिषेकसोबत एका लहान मुलाचा फोटो शेअर केलाय. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 4, 2023, 01:12 PM IST
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोतील 'तो' लहान मुलगा कोण, अभिषेकचं बोट पकडणाऱ्या चिमुकल्याचीच चर्चा title=

बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांची एक लेटेस्ट खूप चर्चेत आहे. याला कारण आहे जलसा बंगल्याचा फोटो आणि अमिभेषकसोबतचा 'तो' चिमुकला यांचा एक फोटो. आता लोकांना प्रश्न पडला आहे की, हा लहान मुलगा कोण आहे? कारण अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट देखील या फोटोसोबत शेअर केली आहे. अमिताभ बच्चन यांची कविता प्रेक्षकांना कायमच आवडतात. 

अमिताभ बच्चन यांची खास पोस्ट 

ताऊ, नाना को चली है पीढ़ी, देखने जलसा गेट पर
ये फाटक पर क्या गुल खिला है, देखें हम भी चलकर ।
ये भीड़ जमा क्यों होती है, आंखें चकित यूं घूरें
अम्मा गोदी , भागे भैया, 'नाना को दूर ही रक्खें '

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

नातवाला दाखवलं 'जलसा' बाहेरचं दृश्य 

या पोस्टमध्ये अमिताभ यांनी एक कोलाज फोटो शेअर केलाय. यामध्ये अभिषेक आणि नातवाचा फोटो आहे. याला ते जलसा बाहेरचं दृश् दाखवत आहेत. अमिताभ यांनी या कवितेतही तेच सांगितलं की, जलसा बाहेरची गर्दी आणि ते चाहत्यांच प्रेम.. सगळं कसं मन भरून आणणार आहे. 

कोण आहे हा चिमुकला 

ही पोस्ट शेअर केल्यानंतर हा चिमुकला कोण असा प्रेक्षकांचा प्रश्न आहे. यावर अनेकांनी कमेंटही केली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्या भाचीचा मुलगा आहे. नैना बच्चन ही अमिताभ यांचे लहान भाऊ अजिताभ बच्चन यांची मुलगी आहे. गेल्यावर्षी जानेवारीमध्ये कुणाल कपूर आणि नैना बच्चन यांना बाळ झालंय. 2015 मध्ये या दोघांनी सेशेल्स आर्यलँडमध्ये लग्न केलं होतं. 

सोशल मीडियावर अशीही प्रतिक्रिया 

या पोस्टमध्ये लोकांनी विचारले आहे की हे बाळ कुणाचं आहे? तर एकाने म्हटलं आहे - 'सर, तुम्ही काय लिहिले आहे ते मला समजले नाही.' एका यूजरने लिहिले - 'म्हणजे, तुम्ही अमिताभ बच्चन असाल तर तुम्ही काही लिहाल का?' दुसऱ्याने म्हटले आहे - 'तू अतिशय भाग्यवान आहेस, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आजोबा नेहमीच सर्वोत्तम असतात आणि त्यांच्यापेक्षा अधिक रक्षणकर्ता कोणीही असू शकत नाही.'