Big B अमिताभ बच्चन यांना आता या दर्जाची सुरक्षा, इतके सुरक्षा रक्षक असणार तैनात

Amitabh Bachchan gets x category : अमिताभ बच्चन यांची सुरक्षा वाढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Updated: Nov 2, 2022, 10:14 PM IST
Big B अमिताभ बच्चन यांना आता या दर्जाची सुरक्षा, इतके सुरक्षा रक्षक असणार तैनात title=

मुंबई : राज्य सरकारने अनेक बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. सलमान खान पाठोपाठ बीग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Security) यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांना आता एक्स दर्जाची सुरक्षा मिळणार आहे. आआधी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही मुंबई पोलिसांकडे होती. अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत आता 2 सुरक्षा रक्षक तैनात केले जाणार आहेत. ज्यामध्ये एक पीएसओ देखील असतो. (amitabh bachchan gets x category security)

सलमान खानची (Salman Khan) सुरक्षा Y वरून Y+ अशी करण्यात आली आहे. त्यानंतर आता अमिताभ बच्चन यांना X दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. यााधी अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. या दोघांना X दर्जाची सुरक्षा देण्यात आलीये. सलमान खान बरोबर आता 11 सुरक्षा कर्मचारी तैनात असणार आहेत.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर अनेक कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सलमान खान देखील त्यांच्या टार्गेटवर होता. असं पुढे आलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनं सलमानला Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

इंटेलिजेन्सकडून आलेल्या अहवालावर कुणाला कोणती सुरक्षा द्यायची हे ठरवलं जातं. त्यानुसार आता सुरक्षा पुरवली जात आहे.