कॅमेरामॅनवर पुन्हा एकदा संतापल्या Jaya Bachchan, पत्नीचं 'हे' रुप पाहताच Amitabh यांची अनपेक्षित प्रतिक्रिया

Amitabh Bachchan आणि जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जया यांच्या अशा वागण्यावर अमिताभ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं 

Updated: Jan 18, 2023, 01:06 PM IST
कॅमेरामॅनवर पुन्हा एकदा संतापल्या Jaya Bachchan, पत्नीचं 'हे' रुप पाहताच Amitabh यांची अनपेक्षित प्रतिक्रिया title=

Amitabh Bachchan And Jaya Bachchan Viral Video : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय असून त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात. तर दुसरीकडे त्यांची पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) या अनेकदा पापाराझींवर ओरडण्यासाठी ओळखल्या जातात. दरम्यान, असेच काहीसे पुन्हा एकदा झाले आहे. इंदूर विमानतळावरचा अमिताभ आणि जया यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकीकडे त्या दोघांना एकत्र कॅप्चर करण्यासाठी पापाराझी प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे यावेळी जया यांचे वागणे नेटकऱ्यांना अजिबात आवडले नाही. अशा लोकांना कामावरून काढून टाकले पाहिजे असे बोलताना जया दिसल्या. यावेळी अमिताभ यांनी जया यांच्या या वागणूकीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Amitabh Bachchan And Jaya Bachchan Viral Video From Indore Airport) 

जया आणि अमिताभ यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावलानं शेअर केला आहे. या व्हिडीओत इंदूर विमानतळावर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन पोहोचल्याचे दिसत आहे. यावेळी विमानतळावरील कर्मचारी त्यांच्या स्वागतासाठी तेथे उपस्थित होते. सगळ्यात आधी जया या दिसतात आणि त्यांचे फोटो काढण्यासाठी पुढे येतात. यावर जया ओरडतात आणि बोलतात कृपया माझे फोटो काढू नका, तुला इंग्रजी कळत नाही का? जयाचा राग पाहता तेथे उपस्थित असलेले सिक्युरीटी पापाराझींना फोटो काढण्यापासून नकार देऊ लागतात. (Jaya Bachchan Scold Paparazzi)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याचवेळी अमिताभ बच्चन हे जया बच्चन यांच्याजवळ येतात. तेव्हा जया बच्चन बोलतात की अशा लोकांना नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे. जया यांचे हे वक्तव्य ऐकताच अमिताभ काही काळासाठी त्यांच्याकडे पाहतात आणि मग पुढे निघून जातात. दरम्यान, जया बच्चन ओरडण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी देखील जया पापाराझींवर अशा ओरडल्या आहेत. 

हेही वाचा : Alia Bhatt Second Pregnancy: लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यांतच आलिया पुन्हा एकदा गरोदर?

दरम्यान, जया यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, जया करण जोहरचा आगामी रोमॅंटिक चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky aur Rani Ki Prem Kahani) मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात जया यांच्यासोबत आलिया भट्ट (Alia Bhatt) , रणवीर सिंग (Ranveer Singh), धर्मेंद्र (Dharmendra) आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.