अखेर नागराज मंजुळेच्या 'झुंड' सिनेमाची रिलीज डेट ठरली

अमिताभ बच्चन यांचा झुंड हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच. कोरोनाकाळात या सिनेमाची रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलण्यात आली. 

Updated: Feb 2, 2022, 10:59 AM IST
अखेर नागराज मंजुळेच्या 'झुंड' सिनेमाची रिलीज डेट ठरली  title=

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'झुंड' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका या सिनेमात आहे. यामुळे या सिनेमाला एक वेगळं महत्व आहे. काही दिवसांपूर्वी हा सिनेमा ओटीटी की चित्रपट गृहात रिलीज होणार अशी चर्चा होती. अखेर त्याला पूर्णविराम लागला आहे. 

नागराज मंजुळे यांचा 'झुंड' सिनेमा ४ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. COVID-19 मुळे, चित्रपटाला त्याची रिलीज डेट अनेक वेळा मागे घ्यावी लागली. पण, शेवटी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. 

अमिताभ बच्चन यांचा हा सिनेमा 'झुंड' हे स्पोर्ट्स ड्रामा, एनजीओ स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. तसेच बच्चन एका प्राध्यापकाच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहेत.

झोपडपट्टीतील मुलांना एकत्र करून ते फुटबॉलची एक टीम तयार करतात, आणि त्यांना जगण्याचा मार्ग दाखवतात अशी चर्चा आहे.

घोषणा करताना, बिग बी यांनी ट्विट केले, "इस टोली से मुकाबला करने के लिए रहो तैयार! हमारी टीम आ रही है #झुंड 4 मार्च 2022 रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात रिलीज होत आहे."