ना बोलता येत होतं ना चालता येत होतं, डोळ्यांची उघडझापही थांबली अन्...; 'बिग बी'ना झालेला गंभीर आजार

KBC 15 Amitabh Bachcahn :  अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 19, 2023, 11:56 AM IST
ना बोलता येत होतं ना चालता येत होतं, डोळ्यांची उघडझापही थांबली अन्...; 'बिग बी'ना झालेला गंभीर आजार title=
(Photo Credit : Social Media)

KBC 15 Amitabh Bachcahn : 'कौन बनेगा करोडपति 15' चे लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बिग बी करत आहेत. इतकंच नाही तर हॉट सीटवर बसणारे स्पर्धक हे त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी अमिताभ यांच्यासोबत शेअर करतात, तर अमिताभ देखील  त्यांच्या चाहत्यांसोबत वेगवेगळ्या गोष्टी शेअर करताना दिसतात. दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये जेव्हा त्यांना मायस्थेनिया ग्रेविस नावाचा गंभीर आजार झाला होता त्याविषयी अमिताभ यांनी एक किस्सा सांगितला आहे. यावेळी अमिताभ यांनी खुलासा केला की ते बोलू देखील शकत नव्हते. या कठीण प्रसंगात दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी खूप मदत केली होती. 

अमिताभ बच्चन यांनी हा किस्सा स्पर्धक श्रीदेव वानखेडे बसले होते. श्रीदेवी यांनी लाइफलाइनचा वापर करत 12 लाख 50 हजार रुपये जिंकले. श्रीदेवी एका अपघातामुळे अधू झाले होते. त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले होते. पण त्यांची पत्नी जया आणि कुटुंबानं त्यांना पाठिंबा दिला आणि यातून ते बाहेर निघू शकले. श्रीदेव वानखेडे यांनी ही कहानी ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळेच भावूक झाले. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अशाच वाईट काळाविषयी सांगितले. त्यावेळी त्यांनी त्याविषयी सांगितले जेव्हा त्यांना मायस्थेनिया ग्रेविस नावाचा मसल्सशी संबंधीत आजार झाला होतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अमिताभ यांना झाला होता गंभीर आजार

अमिताभ यांनी सांगितले की एकदा ते त्यांच्या चित्रपटाची शूटिंग करत होते आणि ते अचानक बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यावेळी कळलं की त्यांना मायस्थेनिया ग्रेविस हा गंभीर आजार झाला आहे. अमिताभ यांनी या आजाराविषयी सांगितले की हा एक मसल डिसऑर्डर आहे. त्याच्यामुळे ते ना चालू शकत होते आणि नाही डोळे बंद करू शकत होते. 

हेही वाचा : 55 वर्षीय मोलकरीणच्या प्रेमात पडले होते 14 वर्षांचे ओम पुरी, शारीरिक संबंध बनवले; पत्नीनं केला होता मोठा खुलासा

अमिताभ यांनी सांगितलं की त्यांचे सीनियर असलेले मनमोहन देसाई त्यांना भेटायला आले आणि म्हणाले तू चिंता करू नकोस. मी तुला व्हीलचेअरवर बसवेन आणि एकदम गप्प राहणारी भूमिका देईन, ज्यात बोलायची गरज पडणार नाही. अमिताभ यांनी सांगितलं की या प्रकारे पाठिंबा मिळाल्यानंतर त्यांना खूप हिंम्मत मिळाली होती. त्यामुळे त्यांचे ते नेहमीच आभारी राहतील.