आदित्य मीराला सांगू शकेल का त्याच्या मनातील भावना?

काय होणार पुढे?

मुंबई : 'नवे पर्व, युवा सर्व' असं म्हणत झी युवा वाहिनीने वैविध्यपूर्ण मालिका सादर करून तमाम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. 'आम्ही दोघी' ही नवीन मालिका झी युवा वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली आहे. आम्ही दोघीमालिकेचं कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणिस्वच्छंदी आहे. मालिकेत विवेक सांगळे आदित्यची भूमिका साकारत आहेत. नुकतेच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की अक्षयच्या ढोंगी स्वभाव सगळ्यांसमोर उघडकीस येतो आणि मीरा व अक्षयच लग्न तुटतं. मीरा जरी उदास असलीतरी आदित्य तिला पुरेपूर आधार देतो आणि प्रेक्षक सध्या मालिकेत आदित्य आणि मीरा यांची वाढती मैत्री पाहत आहेत.

मागील काही भागात प्रेक्षकांनी पाहिलं कि मीरा एका ऑडिटोरियम मध्ये अडकते आणि तिचा फोन देखील लागत नसल्यामुळे घरातील सर्वजण चिंताग्रस्त होतात. मामांना तर मिरच्या काळजीने पॅनिक अटॅक देखील येतो. मधुराआणि आदित्य मीराला शिधायला बाहेर पडतात. आदित्य कसाबसा मीरापर्यंत पोहोचतो. मीराला आदित्यला पाहून हायसं वाटतं आणि जाऊन त्याला घट्ट मिठी मारते. आदित्य आणि मधुरा मीराला सुखरूप घरी घेऊन आल्यावर सर्वघरातील लोकांचा जीव भांड्यात पडतो. झालेल्या सर्व प्रकारचा विचार आदित्य करत असताना त्याला जाणवतं कि त्याच्या मनात मीराविषयी मैत्रीपेक्षा जास्त भावना निर्माण झाल्या आहेत. आदित्य मीरासमोर त्याच्या मनातील भावनाव्यक्त करायचा ठरवतो. आता आदित्य मीराला कसं सांगणार हे प्रेक्षकांना येत्या काही भागात पाहायला मिळेल.