अमेय वाघ अडकला लग्नबंधनात

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कैवल्य अर्थात अमेय वाघ त्याची मैत्रीण साजिरी देशपांडे हिच्यासोबत विवाहबंधनात अडकलाय. पुण्याच्या श्रुतिमंगल कार्यालयात या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. 

Updated: Jul 2, 2017, 04:15 PM IST
अमेय वाघ अडकला लग्नबंधनात title=

मुंबई : 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कैवल्य अर्थात अमेय वाघ त्याची मैत्रीण साजिरी देशपांडे हिच्यासोबत विवाहबंधनात अडकलाय. पुण्याच्या श्रुतिमंगल कार्यालयात या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. 

अमेयच्या लग्नात मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेता, अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. दिल दोस्ती दुनियादारी मालिकेची संपूर्ण टीमही अमेयच्या लग्नात उपस्थित होती. 

गेल्याच महिन्यात अमेयची प्रमुख भूमिका असलेला मुरांबा हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. काही दिवसांपूर्वीच अमेयने सोशल मीडियावर तो आणि साजिरी नव्या नात्यात अडकणार असल्याचे सांगितले होते.