गर्दीचा फायदा घेत गायिकेला जबरदस्ती 'किस'

संतापलेली 'ती' म्हणाली...

Updated: Jun 5, 2019, 04:50 PM IST
गर्दीचा फायदा घेत गायिकेला जबरदस्ती 'किस'  title=

मुंबई : सेलिब्रिटींची भेट घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे सर्वसामान्य चाहत्यांचं स्वप्न असतं. मुळात चाहत्यांना सेलिब्रिटींच्या आयुष्याचा जितका हेवा वाटतो त्याच्या कैक पटींनी त्यांना सेलिब्रिटींच्या जगण्याविषयीचं कुतूहल असतं. परिणामी आपल्या आवडच्या सेलिब्रिटीची एकदा तरी भेट घ्यावी अशीच इच्छा होत असते.  मुळात सेलिब्रिटीही त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या आपुलकीने भेट घेतात. पण, काही वेळा असे काही प्रसंग ओढावले जातात किंवा चाहते त्यांची मर्यादा ओलांडतात ज्या प्रसंगी सेलिब्रिटींचा संताप अनावर होतो. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ पाहता नुकतच अमेरिकन गायिकेला अशाच काहीशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. ही गायिका आहे, माईली सायरस. बार्सिलोना येथे चाहत्यांच्या गर्दीतून आपल्या कारच्या दिशेने जाणाऱ्या माईली जात होती. यावेळी तिचा पतीही सोबत होता. गर्दीतून तिच्या नावाचाच कल्ला सुरु होता. पण, यातच एक चाहता पुढे येत त्याने माईलीचे केस ओढत तिच्या गालांवर किस केलं. 

 
 
 
 

A post shared by Celeb Couch (@whoworewhat) on

हा सर्व प्रकार अवघ्या काही सेकंदांमध्ये झाला. ज्यानंतर माईलीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन झाल्या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला. 'मनाला वाटेल तसे कपडे ती घालू शकते. ती व्हर्जिनही असू, शकते. ती तिच्या पतीसोबत असेल किंवा मग कोणा दुसऱ्यांसोबत. ती नग्नावस्थेत असेल... पण, तरीही तिच्या परवानगीशिवाय मात्र तिला स्पर्श करण्याचा अधिकार कोणालाही नाही...', असं तिने एका ट्विटमध्ये लिहिलं. 

यावेळी तिने तिच्याच एका गाण्यातील ओळ लिहित संताप व्यक्त केला. माईलीने त्यानंतर केलेल्या एका ट्विटमध्ये फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये कपड्यांमुळे तिच्याशी असंच काहीतरी होणं योग्य आहे, अशा आशयाच्या कमेंट्स करण्यात आल्या होत्या. त्यावरही थेट शब्दांत माईलीने उत्तर दिलं. सोशल मीडियावर या प्रकरणाची बरीच चर्चा सुरू आहे.