मुंबई : सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द राइज'ने हिंदी मार्केटमध्ये जवळपास 80 कोटींचा व्यवसाय केला आहे. 'पुष्पा' सध्या ओटीटीवर रिलीज झाला आहे पण तरीही बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई सुरूच आहे.
'पुष्पा'ची गाणी आणि संवाद प्रचंड गाजले आहेत. 'पुष्पा' हिंदी आवृत्तीत प्रदर्शित होण्यामागे गोल्डमाइन्स टेलिफिल्म्सचे दिग्दर्शक मनीष शाह होते, त्यांनी या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आणि नंतर तो हिंदीत प्रदर्शित केला. या साऊथ चित्रपटाला हिंदीत चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता संपूर्ण देश 'पुष्पा द रुल पार्ट 2' च्या आगमनाची वाट पाहत आहे.
अलीकडेच मनीष शाहने एका मुलाखतीत 'पुष्पा 2' च्या रिलीज डेटपासून ते शूटिंग शेड्यूलबाबत माहिती दिली. एका मुलाखतीत मनीष शाह म्हणाले की, 'पुष्पा: द राइज' 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
पहिल्या दिवशी अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 3.33 कोटींची कमाई केली, पण ख्रिसमसनंतर या चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिसवर वेग पकडला आणि आज हा चित्रपट 90 कोटींचा आकडा गाठण्यात यशस्वी झाला आहे.
पुष्पा 2 चे शूटिंग कधी सुरू होणार?
या मुलाखतीत मनीष शाह यांनी सांगितले की, 'पुष्पा 2- द रुल'चे शूटिंग यावर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. लवकरच या चित्रपटाचे काम पूर्ण केल्यानंतर निर्माते त्याचा दुसरा भाग रिलीज करतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुष्पा 2 कधी रिलीज होणार?
मनीष शाह यांनी 'पुष्पा 2'च्या रिलीजचा संपूर्ण लेखाजोखा सांगितला की, हा सिनेमा रिलीज होण्यासाठी कधी आणि किती वेळ लागेल. 'पुष्पा 2' यावर्षी रिलीज होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याचे कारण म्हणजे या दीर्घ चित्रपटाच्या शूटिंगला वेळ लागणार आहे.
त्यांनी सांगितले की, 'पुष्पा 2' चे शूटिंग जवळपास 250 दिवस चालणार आहे. 'पुष्पा'च्या पहिल्या भागाचे शूटिंग 210 दिवस चालले. त्यामुळे शूटिंगवरच त्याचे प्रदर्शन निश्चित केले जाणार आहे. मधेच कोरोनामुळे लॉकडाऊन असेल किंवा काही अडचण आली तर चित्रपट प्रदर्शित होण्यास वेळ लागू शकतो. 2023 पर्यंत पुष्पा 2 प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.