कोरोनाने घेतला आलिया-रणबीरच्या आवडत्या व्यक्तीचा बळी

हा दु:खद प्रसंग फक्त रणबीर आणि आलियावर ओढावला नसून जगातील अनेकांनवर ओढवला आहे.   

Updated: Apr 17, 2020, 04:00 PM IST
कोरोनाने घेतला आलिया-रणबीरच्या आवडत्या व्यक्तीचा बळी  title=

मुंबई : कोरोना व्हायरसचा फैलाव सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण आणि रुग्णांचा आकडा पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊचा कालावधी वाढवला आहे. कोरोना या धोकादायक विषाणूने हजारो लोकांचे प्राण घेतले आहे. दरम्यान या विषाणूमुळे अभिनेता आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने देखील त्यांचा आवडता व्यक्ती गमावला आहे. हा दु:खद प्रसंग फक्त रणबीर आणि आलियावर ओढावला नसून जगातील अनेकांनवर ओढवला आहे. 

रणबीर आणि आलियाने मुंबईतील एका पंचतारंकित हॉटेलच्या वेटरप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाने आपले दु:ख व्यक्त केले आहे. वेटर रोनाल्ड डीमेलो यांचा एक फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'रोनाल्ड यांची ही दु:खद बातमी ऐकल्यानंतर अत्यंत वाईट वाटलं. ते त्यांचा कामात आणि क्षेत्रात चोख होते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते दिवस कसा होता असा प्रश्न नक्की विचारायचे.'असं तिने लिहलं आहे.

शिवाय, हा फोटो त्यांच्या निवृत्ती दिनाचा फोटो असल्याचं देखील आलियाने सांगितले आहे. रोनाल्ड यांचा स्वत:चा देखील एक हॉटेल होता. कोरोनाचं सावट संपूर्ण जगावर आहे. या धोकादायक विषाणूची लागण आतापपर्यंत लाखो नागरिकांना झाली आहे. तर कोरोना व्हायरसने आतापर्यंत हजारो नागरिकांचा जीव घेतला आहे. या सर्व भीतीच्या वातावरणात एक दिलासादायक बाब म्हणजे या आजारातून हजारो रुग्ण सुखरूप बरे देखील होत आहेत.