... म्हणून रणबीर- आलियाच्या लग्नाची तारीख बदलली

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या बातम्या  गेल्या अनेक दिवसांपासून खूप चर्चेत आहेत.

Updated: Apr 12, 2022, 02:58 PM IST
... म्हणून रणबीर- आलियाच्या लग्नाची तारीख बदलली title=

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या बातम्या  गेल्या अनेक दिवसांपासून खूप चर्चेत आहेत. पण आता या कपलने आपलं लग्न  पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. रणबीर आणि आलिया त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे लग्नातून माघार घेत नसले तरी त्यामागचं कारण सुरक्षा आहे.

एका वृत्तानुसार, रणबीर आणि आलिया सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या लग्नाची तारिख पुढे ढकलत आहेत. अलीकडेच आलिया भट्टचा सावत्र भाऊ राहुल भट्टने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. की, 13 किंवा 14 एप्रिलला त्याची बहीण लग्न करणार नाही.तर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

लग्नाशी संबंधित माहिती मीडियामध्ये लीक झाली आहे, त्यामुळे दोघांनी लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 14 एप्रिलला आलिया आणि रणबीर सात फेरे घेणार होते, अशी कबुलीही राहूल भट्टने दिली. लग्नाची तारीख पुढे ढकलण्याच्या कारणाबाबत राहुल भट्ट म्हणाला की, जोपर्यंत माहिती लीक होत नव्हती, तोपर्यंत लग्नाच्या तारखा त्याच होत्या.

मात्र आता ही बातमी लीक झाल्यामुळे तारीखही बदलण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षेचंही एक कारण आहे. त्यामुळे लग्नाच्या तारखेत बदल करण्यात आली आहे. राहुल भट्ट यांनी असंही सांगितलं आहे की, लग्नाच्या एक दिवस आधी हे स्टार कपल त्यांच्या लग्नाबाबत घोषणा देखील करणार आहे. राहुल असंही म्हणाला की, मला जे माहिती आहे त्यानुसार लवकरच घोषणा होईल. यासोबतच त्याने हातवारे करत सांगितलं की, आलिया आणि रणबीरचं लग्न २० एप्रिलच्या आसपास होऊ शकतं.