रणबीरसाठी आलियाने बदलली 'ती' सवय, रणबीर म्हणाला अचानक...

अभिनेता रणबीर कपूरसाठी आलियाने सोडली लहानपणापासूनची 'ती' सवय, रणबीरने बायकोबद्दल केला मोठा खुलासा. वाचा सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Jul 28, 2024, 08:06 PM IST
रणबीरसाठी आलियाने बदलली 'ती' सवय, रणबीर म्हणाला अचानक... title=

Ranbir Kapoor And Alia Bhatt : बॉलिवूडमधील आदर्श जोडी म्हणून प्रसिद्ध असणारे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे सध्या चर्चेत आले आहेत. नुकतेच रणबीरने एका मुलाखतीत आपली वैवाहिक जीवनाबद्दल खुलासा केला आहे. लग्नानंतर आलियाने रणबीरसाठी तिच्या लहानपणापासूनची एका सवयीमध्ये  बदल केला आहे. 

आलियाला लहानपणापासूनच मोठ्या आवाजात बोलण्याची सवय आहे. मात्र, आलियाने ती सवय माझ्यासाठी बदलली आहे. मी लहान असताना माझे वडील देखील मोठ्या आवाजात बोलायचे. मला त्यांची खूप भीती वाटायची. मोठ्या आवाजाने मला त्रास होयचा. आलियाने तिची ही सवय माझ्यासाठी बदलली. सवय बदलणं हे सोपं नव्हते. आलियाचं पटकन प्रतिक्रिया देणं मला थोडासा त्रास द्यायचं पण ते तिने जाणीवपूर्वक बदललं. 

परंतु आलियाने माझ्यासाठी काही गोष्टी बदलल्या. मात्र, मी तिच्यासाठी माझ्यामध्ये काहीच बदल केला नाही. जे मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो. याची मला खंत वाटते. पण मी तिच्यासाठी काहीतरी करु शकेन अशी मला आशा आहे. 

आलिया-रणबीरची प्रेम कहाणी

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे जवळपास 5 वर्षे डेट करत होते. 5 वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी एप्रिल 2022 मध्ये लग्न केलं. ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणबीर आणि आलियामध्ये चांगली मैत्री झाली. ज्याचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. दोघांमधील जवळपास 10 वर्षांचं अंतर होते. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जात होते. मात्र, दोघांनी देखील एकमेकांवर असणारं प्रेम सिद्ध करून दाखवले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

लव्ह अँड वॉर चित्रपट

आलिया आणि रणबीर लवकरच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित लव्ह अँड वॉर या चित्रपटात झळकणार आहेत. रणबीर कपूर हा अॅनिमल चित्रपटात शेवटचा दिसला होता. या चित्रपटात तृप्ती डिमरी, बॉबी देओल आणि रश्मिका मंदाना यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.