आलियाने भर कार्यक्रमात दिली शिवी

करिना म्हणाली, हे आहेत पुढच्या पिढीचे कलाकार 

Updated: Oct 16, 2019, 10:31 AM IST
आलियाने भर कार्यक्रमात दिली शिवी  title=

मुंबई : जिओ मामी फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये करिना कपूर आणि आलिया भट्ट यांची खास उपस्थिती होती. या फेस्टिवलमध्ये स्पेशल सेगमेंट ठेवण्यात आला होता. ज्यामध्ये दोघींनी करण जोहरसोबत खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. या सेगमेंटमध्ये आलिया आणि करिनाने एकमेकींच कौतुक केलं. या सोहळ्यात एक वेळ अशी आली जेव्हा आलियाने बोलता बोलता भरं कार्यक्रमात शिवी दिली. 

करिनाने प्रेग्नेंसीनंतर स्वतःला खूप फिट ठेवलं आहे. ती अनेकदा जीममध्ये वर्कआऊट करताना किंवा स्वतःला अपडेट ठेवताना दिसते. याबाबत आलिया या कार्यक्रमात भरभरून बोलत होती. करिनाचं फॅशनेबल लूक्स आणि तिचं रूटीन यावर आलिया भरभरून बोलत होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@aliaabhatt ’s advice to aspiring actors - Work hard but don't take it too seriously! It's never the end of the world as far as work is concerned. Family is paramount. . . @karanjohar #KareenaKapoorKhan #JioMAMIMovieMelawithStar #JioMAMIwithStar2019

A post shared by Jio MAMI with Star (@mumbaifilmfestival) on

आणि बोलता बोलता तिच्या तोंडून शिवी निघाली. ज्यानंतर आलिया एकदम गप्प बसली आणि तोंडावर हात ठेवून हसू लागली. त्यानंतर करिना कपूर देखील मोठ मोठ्याने हसू लागली. करण जोहरला सुरूवातीला ती काय बोलली हे कळलं नाही. पण जेव्हा त्याला कळलं तेव्हा तो म्हणाला की, हे काय होतंय. मी तुला असं मोठं केलं आहे का? 

या कार्यक्रमाच्यामध्ये करण जोहर वरूण धवनला फोन लावतात. आलिया वरूणला सांगते की, 'VD आम्ही मामी फिल्म फेस्टिवलमध्ये आहोत. तुझा फोन स्पीकरवर आहे त्यामुळे नीट बोल'. तेव्हा वरूणला तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही आणि तो बोलता बोलता शिवी देतो. यानंतर आलिया फोन स्पीकरवरून काढून वरूणला सांगते की, 'आम्ही खरंच मामी फेस्टिवलमध्ये आहोत'. तेव्हा या सगळ्या प्रकरणावर करिना कपूर म्हणते,'तुम्ही बघू शकता ही आजची जनरेशन आहे'

तसेच या अगोदर जिओ मूव्ही मेला विथ स्टार्स 2019 मध्ये आलियाला वितारण्यात आलं होतं की, 'तुला कधी वाटलं हों का की करिना कपूर तुझी ननंद होईल.' त्यावर करिना अचानक मध्येच बोलते की,'असं झालं तर मी या जगातील सर्वात नशीबवान मुलगी असेन'