आलिया भट्टच्या हाती नवा सिनेमा...

कोणत्या दिग्दर्शकासोबत दिसणार आलिया 

Updated: Sep 21, 2019, 01:40 PM IST
आलिया भट्टच्या हाती नवा सिनेमा...  title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या कोणतेही सिनेमे निवडत नसल्याची माहिती असताना आता तिच्या हातात नवा सिनेमा असल्याची माहिती समोर आली आहे. 'ब्रम्हास्त्र' सिनेमात आलिया रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. 

असं असताना आलिया आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. प्रियंका चोप्राला मागे टाकत आलिया भट्टची वर्मी लागली आहे. 'इंशाअल्लाह' हा सिनेमा नाकारल्यामुळे आलियाच्या तारखा मोकळ्या असल्यामुळे तिने हा सिनेमा स्विकारला आहे. (हे पण वाचा - ऑफर मिळूनही का सिनेमे नाकारतात रणबीर - आलिया?)

संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई' या सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेत्री आलिया भट्ट दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आलिया काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसबाहेर स्पॉट झाली. आलियाच्या अगोदर प्रियंका चोप्राची निवड झाली होती. पण तिच्या बिझी शेड्युलमुळे हा सिनेमा आता आलियाकडे गेला आहे. प्रियंका एका अमेरिकन कॉमेडी सिनेमात दिसणार आहे.

आलिया भट्टला आयफा अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात 'राझी' सिनेमाकरता सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आलियाने या अगोदरही वेगवेगळ्या सिनेमांमधून आपला अभिनय प्रेक्षकांसमोर आणला आहे. आणि प्रेक्षकांनी देखील आलियाला मनापासून पसंत केलं आहे. 

'गंगूबाई कोठेवाली' ही चर्चेतील व्यक्ती आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत गंगूबाई यांची लोकप्रियता पोहोचली होती. त्यामुळे या सिनेमाबद्दल सगळ्यांचीच उत्सुकता आहे. हीरामंडी हे सिनेमाचं नाव नसून 'गंगूबाई कोठेवाली' असं नाव ठेवण्यात येणार आहे. सिनेमाच्या स्क्रिप्टची तयारी देखील झाली असून सेटवर देखील काम सुरू झालं आहे.