Alia Bhatt - Ranbir Kapoor : पहिल्यांदाच आलिया-रणबीरचा रोमँटिक अंदाज

गोड अंदाजात आलिया - रणबीर 

Updated: Nov 5, 2021, 06:43 AM IST
Alia Bhatt - Ranbir Kapoor : पहिल्यांदाच आलिया-रणबीरचा रोमँटिक अंदाज  title=

मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी आपलं प्रेम सगळ्यांसमोर व्यक्त करायला सुरूवात केली. असं असताना या दोघांनी पहिल्यांदाच आपला रोमँटिक फोटो शेअर केला आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी रणबीर - आलिया एका खास रोमँटिक पोझमध्ये दिसले. हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

रणबीर कपूर आणि आलिया भट्टने दिवाळीच्या पहिल्या दिवशी दुर्गा माँचा आशिर्वाद घेतला. याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आलिया भट्ट, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, डेबू मुखर्जी, शरबानी मुखर्जी यांनी उत्तर बॉम्बे येथील काली पूजेला हजेरी लावली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt)

बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी दिवाळी 2021 एकत्र साजरी केली. दिवाळीच्या मुहूर्तावर दोघेही एकत्र दुर्गामातेची पूजा करताना दिसले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt)

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पारंपरिक कपड्यांमध्ये पूजा करण्यासाठी पोहोचले.