वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत आलिया भट्टचं मोठं वक्तव्य म्हणाली...

चित्रपट निर्माते महेश भट्ट नेहमीच त्यांच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. 

Updated: May 12, 2022, 12:56 PM IST
वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत आलिया भट्टचं मोठं वक्तव्य म्हणाली... title=

मुंबई : चित्रपट निर्माते महेश भट्ट नेहमीच त्यांच्या  चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. महेश भट्ट यांनी दोन लग्न केली आहेत. महेश भट्ट यांचं पहिलं लग्न किरण भट्ट यांच्यासोबत झालं होतं. या लग्नानंतर त्यांना  जा भट्ट आणि राहुल भट्ट झाले होते.

त्याचबरोबर महेश भट्ट यांनी सोनी राजदानसोबत दुसरं लग्न केलं. या लग्नापासून महेश भट्ट यांच्या पोटी शाहीन भट्ट आणि आलिया भट्ट या दोन मुली झाल्या आहेत. 

एकदा एका चॅट शोमध्ये महेश भट्ट आणि आलिया भट्ट एकत्र आले होते. यादरम्यान आलियाने सांगितलं होतं की, 'लोकं मला अनेकदा सांगत होते की, तुझे वडील महेश भट्ट यांनी दोन लग्न केली आहेत.' आलियाच्या मते, तिच्यासाठी ही एक सामान्य गोष्ट होती. की तिच्या वडिलांनी दोन लग्न केली आहेत.

चॅट शोमध्ये आलिया पुढे म्हणाली, 'मला वाटतं की, हे माझ्यासाठीही सामान्य होतं कारण आम्ही अनेकदा घरी याविषयी बोलत असायचो.' आमच्या वडिलांनी आमच्यापासून काहीही कधीही लपवलं नाही. त्याचबरोबर महेश भट्ट म्हणाले, 'माझ्या घरात भिंती नाहीत, माझी मुलं माझा भाग आहेत, माझं रक्त माझं रक्त आहे. त्यामुळे त्यांना माझ्याबद्दल सगळं काही माहित असलं पाहिजे.'
 
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आलिया भट्ट लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलियासोबत रणबीर कपूरही दिसणार आहे. जरी आलिया भट्ट याआधी गंगूबाई काठियावाडी आणि ट्रिपल आर मध्ये दिसली आहे. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला धुमाकूळ घातला आहे.