आलिया भट्ट की कपूर? कपूर घराण्याचं आडनाव लावण्याबाबत अभिनेत्री म्हणते...!

आलियानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Aug 21, 2022, 10:15 AM IST
आलिया भट्ट की कपूर? कपूर घराण्याचं आडनाव लावण्याबाबत अभिनेत्री म्हणते...! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. आलिया सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. यंदाच्या वर्षीच आलिया आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  लग्नबंधनात (Alia Bhatt and Ranbir Kapoor Marriage) अडकले. आधी लग्न आणि मग प्रेग्नंसी या पैकी कोणत्याच गोष्टीचा आलियाच्या कामावर परिणाम झाला आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाला लग्नानंतर तिचं आडनाव बदल्यावर प्रश्न विचारला असता आलियानं तिचं मत मांडलं आहे. 

आणखी वाचा : सिनेमे फ्लॉप होण्यामागे माझ्याशिवाय...; अक्षय कुमारचा खळबळजनक खुलासा

आसिया भट्टला तिचा पती रणबीरचं आडनाव लावण्यावर प्रश्न विचारला. खरंतर लग्नानंतर आलियानं तिच्या नावापुढे कपूर आडनाव लावले नाही. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही तिच्या नावा पुढे कपूर नाही. तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आलिया म्हणाली, तिचे स्क्रीनवर नाव हे आलिया भट्ट असेल आणि ती नेहमीच भट्ट असेल, पण आता आलिया तिचं नाव कागदपत्रांवर बदलणार आहे. 

आणखी वाचा : 'सेक्रेड गेम्स' पेक्षाही 'या' दाक्षिणात्य वेब सीरिजचा थरार, इंटिमेट सीनही...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अलीकडील, आलियाने सांगितलं की ती स्क्रीनवर तिचं नाव बदलणार नाही. ‘मिड-डे’शी बोलताना ती म्हणाली, ‘तिच्या पासपोर्टवर नाव अपडेट करण्याबाबत सांगितले की, मला हा बदल करण्यासाठी आधी वेळ नव्हता मिळाला, आता मी कपरू हे आडनाव लावणार आहे. हे करताना मला आनंद होत आहे. तर रणबीरनं त्याच्या पासपोर्सटवर विवाहीत असल्याचा बदल केला आहे. 

आणखी वाचा : King Cobra च्या तोंडातून निघाला विषारी साप, ती घटना पाहून नागरिकही झाले थक्का, Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

आलिया आणि रणबीर एप्रिल 2022 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवर एकत्र काम करताना ते एकमेकांच्या जवळ आले आणि त्यानंतर काही वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या वर्षी जूनच्या अखेरीस आलियानं लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याची गोड बातमी तिच्या चाहत्यांना दिली.

आणखी वाचा : जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर महिला छाटतात स्वत: च बोट! हदरवणारी परंपरा

दरम्यान, 'हॉलीवूड डेब्यू प्रोजेक्ट हार्ट ऑफ स्टोनसाठी आलिया सुमारे एक महिना यूकेमध्ये होती. तर होणाऱ्या बाळाला भट्ट हे आडनाव देणार नाही याविषयी बोलताना आलिया म्हणाली, मी कपूर कुटुंबासोबत एकत्र राहत असताना त्या बाळाला मी भट्ट आडनाव नाही लिहू शकत.'