रणबीर कपूरच्या या गाण्याची फॅन झाली आलिया भट्ट...

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर लवकरच संजय दत्तच्या बायोपिक संजू मध्ये संजय दत्तची भूमिका साकारत आहे. 

Updated: Jun 12, 2018, 10:18 AM IST
रणबीर कपूरच्या या गाण्याची फॅन झाली आलिया भट्ट... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर लवकरच संजय दत्तच्या बायोपिक संजू मध्ये संजय दत्तची भूमिका साकारत आहे. या सिनेमाचे पोस्टर्स, टीजर, ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. कर हर मैदान फतह हे सिनेमाचे गाणे चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. गाण्याचे बोल अतिशय प्रेरणादायी आणि भावूक करणारे आहेत. सुखविंदर सिंगच्या आवाजातील या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. खास गोष्ट ही की, आलिया भट्ट देखील हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकत आहे.

हा आहे पुरावा

आलियाने इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या फोनच्या म्युजिझ प्लेअरचा एक स्क्रीनशॉट शेअर केला. ज्यात रणबीरचे गाणे कर हर मैदान फतह प्ले होताना दिसत आहे आणि तिने रिपीट मोड ऑन ठेवला आहे. यावरुन आपल्या बॉयफ्रेंडचे हे गाणे आलियाला चांगलेच भावलेले दिसते. रणबीरचा हा सिनेमा २९ जूनला प्रदर्शित होईल. या सिनेमा पाहण्यासाठी रणबीर कपूर आणि संजय दत्त दोघेही अत्यंत उत्सुक आहेत. 

ब्रह्मास्त्रच्या शूटिंगमध्ये व्यस्त

आलिया आणि रणबीर ब्रह्मास्त्र हा सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. सिनेमात आलिया-रणबीरसोबत अमिताभ बच्चनही प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाची निर्मिती करण जोहर तर दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित होईल.