आलियाने Kiss करण्यासाठी ओढलं, तो जवळ येताच...

या गाण्यात त्याची आलियासोबतची केमिस्ट्री जबरदस्त वाटत आहे.

Updated: Feb 21, 2022, 06:28 PM IST
 आलियाने Kiss करण्यासाठी ओढलं, तो जवळ येताच... title=

मुंबई : गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगण  एकत्र काम करणार असल्याने आधीच खळबळ उडाली आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सैया हे चित्रपटाचे गाणे रिलीज झाले तेव्हा या गाण्यात शंतनू माहेश्वरीला पाहून चाहते आणखीनंच एक्साईटेड झाले. या गाण्यात त्याची आलियासोबतची केमिस्ट्री जबरदस्त वाटत आहे.

गंगूबाईंच्या आयुष्यातील आणखी एक पैलू सांगणारं गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या दोघांचं 'मेरी जान' हे चित्रपटातील दुसरे गाणे रिलीज झाले आहे.

गाण्यात गंगूबाई म्हणजेच आलिया तिचा प्रियकर अफसान म्हणजेच शंतनू माहेश्वरीसोबत कारच्या मागच्या सीटवर रोमान्स करताना दिसत आहे. त्यांचा हा इंटीमेट सीन खूपच व्हायरल होत आहे. 

आलिया, तिच्या ओठांवर गुलाब दाबून, शंतनूला किस केण्यास प्रवृत्त करते. नंतर, जेव्हा शंतनू जबरदस्तीने किस करतो, तेव्हा आलिया त्याला कानाशिलात लगावते, पण नंतर त्याला शांत करते. असं या गाण्यात दाखवण्यात आलं आहे. या रोमँटिक गाण्यात, दोघांचा किससाठीची धडपड दाखवणारा हा सीन सध्या खूपच चर्चेत आहे. 

नीती मोहनच्या आवाजातील मेरी जान या गाण्याला रेट्रो टच देण्यात आला आहे.