Alia Bhatt Instagram : बॉलिवूड स्टार कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) यांच्या बाळाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. आलियाने लग्नाच्या दोन महिन्यांनंतर सोशल मीडियावर सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्यानंतर कपूर, भट्ट कुटुंबासोबत चाहते देखील रणबीर आलियाच्या बाळाच्या (Ranbir Alia baby girl) प्रतीक्षेत होतेय अखेर आलिया भट्टनं 6 नोव्हेंबर 2022 ला एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलिया आणि रणबीर आता आई-वडिलांच्या भूमिकेत आले आहेत.
आलियाने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत मुलगी झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. आता आई झाल्यानंतर आलियाने पहिला फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये आलियाचा चेहरा दिसत नसला तरी फोटो मात्र खास आहे. सध्या आलियाची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. (alia bhatt and ranbir kapoor baby girl)
आई झाल्यानंतर आलियाची पहिली पोस्ट
आलियाने एक कॉफीच्या कपचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर 'Mama' असं लिहिलं आहे. शिवाय कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने 'it me' म्हणजे ही मी... असं लिहिलं आहे. आलियाच्या फोटोवर चाहते आणि सेलिब्रिटींनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. (alia bhatt and ranbir kapoor)
मुलीच्या जन्मानंतर आलिया-रणबीरचा मोठा निर्णय
आलिया आणि रणबीर बाळाला सर्वांपासून दूर ठेवू इच्छितात. कारण तिला कोणताही संसर्ग होऊ नये. बाळ (alia bhatt and ranbir kapoor baby) अजून लहान आहे, अशा परिस्थितीत तिला अनेक प्रकारचे संसर्ग होऊ शकतात. म्हणून सध्या कोणताही पाहुणा किंवा सेलिब्रिटी आलिया-रणबीरला भेटायला येऊ नये असं वाटतं.