मुंबई : आलिया आणि रणबीरच्या मैत्रीचे किस्से सगळीकडेचं रंगत आहेत. आता रणबीरची आई नीतू कपूर यांनीही अप्रत्यक्षरित्या या नात्याला दुजोरा दिला आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने आपलं प्रेम लपवण्याचा कितीही प्रयत्न केला असला तरी त्यांचा हा लपाछपीचा खेळ आता संपला असून त्यांच प्रेम सगळ्यांसमोर आलं आहे.
आलियाच्या एका चुकीमुळे पुन्हा एकदा त्यांच्या नात्याबद्दल खुलासा झाला आहे. कारण आता ऋषी कपूरच्या पाठोपाठ रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूरने देखील एक अशी गोष्ट केली आहे ज्यामुळे हे नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. आलियाने आपली आई सोनी राजदानचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला होता त्या फोटोला रणबीर कपूरची आई नीतूने लाईक केल आहे. त्यानंतर आलियानेही नीतू यांच्या कमेंटवर किसेसचे इमोजी टाकले आहेत.
क्या बात है.. आलिया आपल्या सासूविषयी किती आदर आहे हे यातून दिसत आहे. मुली लग्नानंतर सासुला मस्का लावतात पण आलियाने याची प्रॅक्टीस आतापासुनचं सुरू केली आहे असं दिसतं आहे.नॉट बॅड आलिया. आधी आलिया रणबीरच्या आईला नीतू आंटी असं म्हणायची पण आता ती त्यांना मम्मी बोलायला लागली आहे. आता तर सगळ्यांचीच खात्री पटलीये की आलिया आणि रणबीर यांच्यात काहीतरी नक्कीचं आहे..
रणबीरच्या येण्याने आलियाची प्रोफेशनल लाईफसुद्धा चांगलीचं जोरात चाललीये..रणबीर आलियासाठी लकी ठरलाये....राजी या सिनेमाच्या यशानंतर आलिया लवकरचं बरेली की बर्फीच्या दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांच्यासोबत एक सिनेमा करणारये..
म्हणजेच आता आलिया आपल्या वैयक्तिक आयुष्याबरोबरचं आपल्या करियरबद्दलही खूपचं फोक्स झालीये... आलिया आमच्याकडून तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई