Alia Bhatt ला दिलेल्या वागणुकीमुळे रणबीर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, नेटकरी म्हणाले...

आलिया आणि रणबीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 15, 2022, 02:11 PM IST
Alia Bhatt ला दिलेल्या वागणुकीमुळे रणबीर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, नेटकरी म्हणाले... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि पती रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे दोघं लवकरच आई-वडील होणार आहेत. रणबीर आणि आलिया सध्या 'ब्रम्हास्त्र' या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चर्चेचा विषय ठरत आहेत. या सगळ्यात त्या दोघांचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी रणबीरला ट्रोल केले आहे. (alia bhatt and ranbir kapoor video viral actor got trolled for doing this to wife) 

आणखी वाचा : लग्नाआधीच बदललं ऋतिकच्या Girlfriend चं नाव? किस्सा एकदम ओके!

रणबीर आणि आलियाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरिंदर चावलानं शेअर केला आहे. या व्हिडीओत रणबीरनं पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे. तर आलियानं पिवळ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे. 

आणखी वाचा : 'त्या' तीन सेकंदांनी बदललं ऐश्वर्या रायचं आयुष्य, एकदा तुम्हीही पाहा कुठे नशीब फळफळलं 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : बॉलिवूडविषयी Bahubali फेम राम्याचं धक्कादायक वक्तव्य, दाक्षिणात्य कलाकारांना झालंय तरी काय?
या व्हिडीओत रणबीर त्याच्या गाडीतून उतरताना दिसतो. त्यानंतर तो त्याच्या चाहत्यांसोबत फोटो काढतो. पुढे जाऊन रणबीर चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि पत्नी आलियाला भेटतो. यावेळी रणबीरला पाहताच आलिया त्याचे केस ठीक करू लागते. पण रणबीरला हे पटत नाही आणि तो तिचा हाथ ढकलतो. रणबीर आणि आलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

आणखी वाचा : मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा 'तो' Topless फोटो पुन्हा व्हायरल!

रणबीर आणि आलिया यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, 'त्यानं तिला केसांना स्पर्श का करु दिला नाही? रणबीरचं वागणं विचित्र आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मुलं त्यांच्या गर्लफ्रेंडला कधीच त्यांच्या केसांना हात लावू देत नाहीत.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'ते दोघ एकत्र खूप सुंदर दिसतात.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'त्याचं तिच्यावर प्रेम नाही असं दिसून येतं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'रणवीरकडून शिक जरा.'