मुंबई : 'लॉक अप' आणि 'बिग बॉस' सारख्या रिअॅलिटी शोचा भाग असलेल्या अली मर्चंटने 2 नोव्हेंबरला तिसरं लग्न केलं आहे. गेले अनेक दिवस अली मर्चंटच्या तिसऱ्या लग्नाची बातमी खूप दिवसांपासून चर्चेत होती आणि आता तिच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत अलीने त्याची गर्लफ्रेंड अंदलीब जैदीशी लग्न केलं आहे.
38 वर्षीय अली मर्चंटने 2 नोव्हेंबर 2023 रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये अंदलिब जैदीशी लग्न केलं आहे. ज्याचे अनेक फोटो समोर आले आहेत. याआधी अली मर्चंटने दोनदा लग्न केलं होतं. पहिलं लग्न त्याने सारा खानसोबत केलं होतं, जे दोन महिन्यांतच तुटलं. त्यानंतर त्याचं दुसरं लग्न अनम मर्चंटसोबत झालं आणि 5 वर्षानंतर तो तिच्यापासून वेगळा झाला.
अली मर्चंटने आता प्रोफेशनने मॉडेल असलेल्या अंदलीब जैदीशी लग्न केलं आहे. एका फॅशन शोदरम्यान दोघांची भेट झाली होती. लग्नाला फक्त त्याचे कुटुंब आणि काही मित्र उपस्थित होते. दरम्यान, अली मर्चंट आता 15 नोव्हेंबरला मुंबईत आपल्या लग्नाचं रिसेप्शन देणार आहे. 'ईटाईम्स'शी खास संवाद साधताना अभिनेत्याने सांगितलं की, अंदलीब आणि माझं लग्न झाल्याचा मला आनंद आहे.
तिच्या इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत अलीने लिहिलं आहे की, आणि आता आपण कायमचे एकत्र फिरू शकतो, नेहमी आनंदाने भरलेल्या स्टार्सना फॉलो करू शकतो. यासोबतच अलीने लिबास या वेब शोमध्ये काम केलं आहे. मात्र, गेल्या ५ वर्षांपासून त्याने टीव्हीपासून अंतर ठेवलं आहे. विक्रम बेताल की रहस्य गाथा, बंदिनी, आहट आणि शपथ यांसारख्या टीव्ही शोमध्ये दिसलेला अली म्हणतो की, मला टीव्हीपेक्षा वेबमध्ये काम करण्यात जास्त मजा येते. टीव्हीच्या तुलनेत, तुम्ही वेब शोमध्ये अनेक महिने समान पात्र साकारत नाही.