लग्नानंतर Akshaya Deodhar ची पहिली मकर संक्रांत, अभिनेत्रीचा Festive लूक व्हायरल

Akshaya Deodhar चा मकर संक्रात लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय... तिनं शेअर केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Jan 14, 2023, 03:43 PM IST
लग्नानंतर Akshaya Deodhar ची पहिली मकर संक्रांत, अभिनेत्रीचा Festive लूक व्हायरल  title=

Akshaya Deodhar Makarn Sankrant Look :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) सर्वात प्रसिद्ध जोडी राणादा आणि पाठकबाई लग्न बंधनात अडकले आहेत. राणा आणि अंजलीची भूमिका साकारणारे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर (Hardik Joshi-Akshaya Deodhar) यांचे लाखो चाहते आहेत. त्या दोघांमध्ये ऑनस्क्रिय असलेल्या केमिस्ट्रीनं प्रेक्षकांना वेड लावलं. आता त्या दोघांच्या जोडीला खऱ्या आयुष्यात रोमान्स करताना नेटकरी पाहत आहेत. लग्नानंतर अक्षयाची ही पहिली मकर संक्रांती आहे. या निमित्तानं अक्षयानं तिचा मकर संक्रांती लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

हार्दिक आणि अक्षया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. दोघेही फोटो आणि व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असतात. नुकताच अक्षयानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या मकर संक्रांतीचा लूक शेअर केला आहे. मकर संक्रांती निमित्तानं काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यात येतात. तर अक्षयानं देखील काळ्या रंगाची साडी नेसली आहे. ‘सुख कळले’, असं कॅप्शन अक्षयानं या व्हिडीओला दिलं आहे. क्षयाच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'पाठकबाई खूपच सुंदर दिसत आहात.’ नेटकऱ्यांनी अशाच अनेक कमेंट करत अक्षयाची स्तुती केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'पैशांसाठी निर्मात्याशी केलं दुसरं लग्न...', दाक्षिणात्य अभिनेत्री नेटकऱ्यांकडून ट्रोल

दरम्यान, अक्षया आणि हार्दिक या दोघांची केमिस्ट्री ऑनस्क्रिन पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. या दोघांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून हार्दिक आणि अक्षया घराघरात पोहोचले होते. या मालिकेनंतर ते दोघं परत एकदा पडद्यावर दिसणार का असा प्रश्न चाहत्यांना होता. इतकच काय तर कधी तरी पुन्हा एकदा हार्दिक आणि अक्षयानं मालिकेत काम करावे अशी इच्छा होती. मालिका संपून आज दोन वर्षे झाली आहेत. तरी सुद्धा आजही मालिकेतील त्यांचे व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या व्हिडीओवर नेटकरी आणि त्यांचे चाहते अजूनही सुंदर कमेंट्स करत असतात. 

अंजली आणि राणा दिसणार पुन्हा एकदा 

हार्दिक आणि अक्षया हे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. मात्र, यावेळी मालिकेसाठी नाही तर झी मराठीवर 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात ते दोघे एकत्र दिसणार आहेत. यावेळी अक्षया आणि हार्दिकच्या चाहत्यांना त्यांना वेगवेगळे मजेशीर खेळ खेळताना पाहता येणार आहे. हार्दिक आणि अक्षय यांनी हजेरी लावलेला हा एपिसोड 15 जानेवारी रोजी मकर संक्रांती निमित्तानं दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होणार आहे. मकर संक्रांत स्पेशल एपिसोडमध्ये हार्दिक आणि अक्षया यांची जुगलबंदी पाहून नक्कीच त्यांच्या चाहत्यांना आनंद होईल.