राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्याच्या फोटोवर एक्स बॉयफ्रेंडने अशी दिली प्रतिक्रिया

राणादा आणि पाठकबाई यांचा साखरपुडा झाला असून लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. 

Updated: May 7, 2022, 02:41 PM IST
राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्याच्या फोटोवर एक्स बॉयफ्रेंडने अशी दिली प्रतिक्रिया title=

मुंबई : झी मराठी वरील मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ चांगलीच गाजली होती. या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात जागा मिळवली. कारण होतं राणादा आणि पाठकबाई ही जोडी. या मालिकेतूनच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांना प्रसिद्धी मिळाली. ही जोडी महाराष्ट्राची खास बनली. पण ही जोडी खऱ्या आयुष्यात जेव्हा एकत्र आले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

अक्षय्य तृतीयाच्या दिवशी हार्दिक आणि अक्षया यांचा साखरपुडा झाला. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाले. या जोडीला महाराष्ट्राने भरभरुन शुभेच्छा ही दिल्या. पण यांची चर्चा असतानाच आता अक्षया देवधरच्या एक्स बॉयफ्रेंडने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. साखरपुड्याचे फोटो शेअर करत तिने यावर ‘अहा ऽऽऽ’ असे कॅप्शन ही दिले. अभिनेता हार्दिक जोशीने देखील त्यांच्या साखरपुड्याचे फोटो इन्स्टावर शेअर केलेत. ‘अखेर साखपुडा पार पडला… #अहा ऽऽऽ’ असं कॅप्शन त्याने दिलं.

साखरपुड्याच्या फोटोवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्यात. यात अक्षया देवधरचा एक्स बॉयफ्रेंड सुयश टिळक याने देखील कमेंट केली. सुयश टिळकने ‘खूप खूप शुभेच्छा’ अशी प्रतिक्रिया दिली. अक्षया देवधर हिने देखील त्यावर ‘धन्यवाद’ अशी कमेंट केली.

अक्षया देवधर आणि सुयश टिळक यांच्या रिलेशनशिपच्या अनेक दिवस चर्चा रंगल्या. पण दोघांनी ही आपल्या या नात्याबद्दल जाहीर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर येत होते. पण नंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या ही समोर आल्या होत्या.

ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांनी अनफॉलो केले. सुयशने अभिनेत्री आयुषी भावे सोबत विवाह करत नव्या आयुष्याची सुरुवात केलीये.